Kalyan; आधारवाडी कारागृहातील दोन कैद्यांचा पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला

कल्याणच्या आधारवाडी कारागृहा गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोग असलेल्या दोन कैद्यांनी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Kalyan; आधारवाडी कारागृहातील दोन कैद्यांचा पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला
Kalyan; आधारवाडी कारागृहातील दोन कैद्यांचा पोलिस अधिकाऱ्यावर हल्लाSaam Tv

कल्याण : आधारवाडी कारागृहात गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या, रेकॉर्डवरील २ आरोपींनी कारागृहातील बराकीची तपासणी करण्याकरिता आलेल्या पोलीस अधिकारी आनंद पानसरे यांच्या मानेवर पेनाच्या झाकणाला असलेल्या, पत्र्याच्या हँडलने जोरदार वार केला आहे. वरिष्ठावर हल्ला झाल्याने मध्ये पडत आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करणारे कर्मचारी भाऊसाहेब गांजवे यांच्या ओठावर देखील त्याने वार करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

याप्रकरणी जेल प्रशासनाकडून खडकपाडा पोलीस ठाण्यात महम्मद अल्ताफ उर्फ आफताब खालिद आणि दिलखुश उर्फ अंकित महेंद्र प्रसाद या २ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आनंद पानसरे आणि भाऊसाहेब गांजवे कारागृहातील कैद्याच्या बराकीची पाहणी करत होते. महम्मद आणि दिलखुश या दोघांच्या बराकीतून ते निघत असतानाच अचानक यातील एका आरोपीने पानसरे यांच्यावर पाठीमागून वार केला आहे.

Kalyan; आधारवाडी कारागृहातील दोन कैद्यांचा पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला
पुणे स्टेशन आणि 'ती' दोन वर्षे.....

पत्र्याला धार काढून, त्याला टोकदार बनविण्यात आल्याने त्यांच्या मानेला खोलवर जखम झाली आहे. तर, त्यांना वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या भाऊसाहेब यांच्या ओठावर दुसऱ्या कैद्याने वार केला आहे. आरडा- ओरडा होताच इतर कर्मचारी धावत येत त्याच्याकडील हत्यार काढून घेतले आहे. पेनाच्या झाकणाला अडकविण्याकरिता असलेल्या पत्र्याच्या हँडलला टोक काढून त्यांनी शस्त्र तयार केल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपी विरोधात भारतीय दंडविधान कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com