देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप जीपचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू २५ जण जखमी

अहमदनगर येथून खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ या ठिकाणी देव दर्शनाकरिता भाविकांना घेऊन जाणाऱ्या पिकअप जीपच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात
देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप जीपचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू २५ जण जखमी
देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप जीपचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू २५ जण जखमी Saam Tv

लोणावळा : अहमदनगर Ahmednagar येथून खोपोली khopoli येथील गगनगिरी महाराज मठ Gagangiri Maharaj Math या ठिकाणी देव दर्शनाकरिता भाविकांना घेऊन जाणाऱ्या पिकअप जीपच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात accident झाले आहे. या अपघातात २ ठार तर २५ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यामध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास जुन्या मुंबई mumbai- पुणे पुणं राष्ट्रीय महामार्गावर highway लोणावळ्यातील lonavala वलवण पुलाजवळ झाला आहे,

हे देखील पहा-

पिकअप वाहन चालक संदिप ज्ञानेदव भालके (वय-४१) रा. कोठे बुद्रुक, सगमंनेर,अहमदनगर आणि दिपक सुभाष कडाळे (वय-१८) रा.पिंपळदरी, अकोले, अहमदनगर असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर जखमींमध्ये अक्षय पंढरी कडाळे, अजय भाऊसाहेब कडाळे, राकेश कडाळे, निलेश कडाळे, विजय शिवाजी मेंगाळ, रेवन कडाळे, अवदुत मधे, अर्जुन कडाळे, करण कडाळे, संतोष पारधी, विलास कडाळे, प्रविण दिंगबर भगत, विजय ज्ञानदेव कडाळे, ओंमकार प्रकाष कडाळे, लक्ष्मी कुंडलीक कडाळे, रेश्मा पारधी, काजल कडाळे सर्वजण रा.पिंपळदरी ता. अकोले जि.अहमदनगर येथील आहेत.

देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप जीपचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू २५ जण जखमी
मोठी कारवाई! मुंबई विमानतळावरून तब्बल २ कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन परदेशी महिलांना अटक

अमोल सावळेराम दुधवडे (रा. करजुले पठार,संगमनेर, अहमदनगर) करण सुदाम उघडे (वय-१९) रा.गुंजाळवाडी, संगमनेर, अहमदनगर तसेच इतर ५ महीला आणि ५ लहान मुले (पुर्ण नाव माहीत नाही) यांचा समावेश आहे. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यामधील संगमनेर मधील पिंपळदरी परिसरामधील भाविक हे अहमदनगर येथून खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ या ठिकाणी देवदर्शनाकरिता पिकअप वाहनाने (क्रमांक- एमएच-14- जीयु- 9227) जात होते. मंगळवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास भरधाव वेगात वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे पिकअप गाडी लोणावळ्या मधील वलवण गावच्या हद्दीत जुन्या मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरात धडकली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com