एमएमआरडीएच्या दोन अधिकाऱ्यांना १ लाख २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक...

शहाजी जोशी आणि संगीता टकले अशी लाच घेणाऱ्या या दोन अधिकाऱ्यांची नावे असून जगदीश पाटील असे मध्यस्थी असलेल्या खासगी व्यक्तीचे नाव आहे.
एमएमआरडीएच्या दोन अधिकाऱ्यांना १ लाख २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक...
एमएमआरडीएच्या दोन अधिकाऱ्यांना १ लाख २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक...

मुंबई: मुंबईच्या एमएमआरडीए कार्यालयातील सहाय्यक समाज विकास अधिकारी व उपजिल्हाधिकारी (समाज विकास अधिकारी) सह खासगी व्यक्तीस लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. शहाजी जोशी आणि संगीता टकले अशी या दोन अधिकाऱ्यांची नावे असून जगदीश पाटील असे मध्यस्थी असलेल्या खासगी व्यक्तीचे नाव आहे. (Two MMRDA officials arrested for accepting bribe of Rs 1 lakh 20 thousand rupees)

हे देखील पहा -

तक्रारदाराची राजारामवाडी, अलीयावर जंग मार्ग, विलेपार्ले पूर्व येथे झोपडी होती. सहारा उन्नत मार्ग प्रकल्पात विस्तारीत करण्यासाठी एमएमआरडीएकडून तक्रारदाराची झोपडी तोडण्यात आली. त्या ऐवजी तक्रारदारास एमएमआरडीएकडून इमारत क्रमांक १९/डी कुर्ला पश्चिम एचडीआयएल येथे खोली देण्यात येणार होती. या सदनिकेचे वाटप पत्र (Allotment letter) मिळण्यासाठी तक्रारदारानं समाज विकास अधिकारी कक्षात अर्ज केला होता. हा अर्ज शहाजी जोशी, संगीता टकले यांच्याकडे प्रलबिंत होता. हे वाटप पत्र (Allotment letter) देण्यासाठी शहाजी याने आरोपीकडे १ लाख ५० हजारांची मागणी केली.

लाच देण्याची इच्छा नसल्याने १६ नोव्हेंबर रोजी तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. १७ नोव्हेंबर रोजी लाच लुचपत विभागाच्या अधिकारऱ्यांनी तक्रारदाराच्या पडताळणीवर खात्री करून घेतली. तपासात आरोपी शहाजी व संगीता यांनी घराचे Allotment letter साठी १ लाथ ५० हजार लाट मागितली. तडजोड अंती १ लाख २० हजार रुपये देण्याचे ठरले.

एमएमआरडीएच्या दोन अधिकाऱ्यांना १ लाख २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक...
NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणींत वाढ; SIT द्वारे कागदपत्रांची तपासणी होणार!

लाच घेण्यासाठी आरोपी शहाजी व संगीता यांनी जगदीश पाटील याला पाठवले. जगदीश पाटीलने लाच घेताच त्याची माहिती इतर दोन आरोपींना दिली. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने खासगी व्यक्तीकडून लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम नुसार कलम ७, ७अ, १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Edited By - Akshay Baiane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com