चिंताजनक! पुण्यात ओमिक्रॉन BA.5 सब-व्हेरियंटच्या 2 रुग्णांची नोंद

ओमिक्रॉन चा सब-व्हेरियंट BA.5 चा महाराष्ट्रात शिरकाव
Corona News
Corona NewsSaam tv

नवी दिल्ली - राज्यात कोरोनाने (Corona) पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता पुन्हा वाढली आहे. अशातच महाराष्ट्रात (Maharashtra) ओमायक्रॉनचा (Omicron) सबव्हेरियंट बीए.5 (Sub Variant BA.5) ची लागण झालेल्या २ रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. पुण्यामध्ये (Pune) ओमायक्रॉन BA.5 सब-व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळून आले आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

हे देखील पाहा -

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुबईहून परतल्यानंतर या दोघांची पुणे विमानतळावर नियमित तपासणी करण्यात आली. या दोन्ही रुग्णांना ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट बीए.5 ची लागण झाली आहे. दोन रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुण्यात पाठवण्यात आले होते. दोन रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले. दोन्ही रुग्ण महाराष्ट्राच्या बाहेरील आहेत. सध्या व्यावसायिक कारणास्तव ते पुण्याच्या ग्रामीण भागांत वास्तव्यास आहेत. या दोन्ही बाधित रुग्णांमध्ये, कोणत्याही प्रकारची लक्षणं दिसून आलेली नाहीत. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. दरम्यान ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत.

ओमिक्रॉनचे सब-व्हेरियंट किती धोकादायक?

ओमिक्रॉनचे (Omicron) हे दोन्ही उपप्रकार BA.2 सारखेच आहेत. ओमिक्रॉनचा BA.2 व्हेरियंटमुळेच देशात कोरोनाची तिसरी लाट आली होती.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुसार, BA.4 आणि BA. 5 या व्हेरियंटनं अद्याप गंभीर स्वरूप प्राप्त केलं नाही. मात्र, ओमिक्रॉनच्या अन्य उपप्रकारांच्या तुलनेत याचा संसर्ग वेगाने होतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरातील दहाहून अधिक देशांमध्ये BA.4 आणि BA. 5 चे बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते.

युरोपियन सेंटर फॉर डीसीज कंट्रोल आणि अमेरिकेच्या सेंटर फॉर डीसीज कंट्रोलने हे दोन्ही सबव्हेरियंट चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. अद्याप या सबव्हेरियंटमुळे गंभीर आजार झाल्याचे पुरावे आढळले नाहीत. मात्र, त्यांचा अन्य विषाणूंच्या तुलनेत अधिक वेगाने प्रादूर्भाव होतो.

ज्या देशांमध्ये ओमिक्रॉनच्या BA.2 व्हेरियंटमुळे नवी लाट आली होती, तिथे BA.4 आणि BA. 5 या व्हेरियंटचा परिणाम कमी प्रमाणात दिसून आलेला आहे.

Corona News
शिवसेनेकडून सुहास कांदेंच्या आरोपांची पोलखोल; पुरावा देऊन दिले उत्तर

कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरियंट हा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. भारतासह जगातील अनेक देशांत या व्हेरियंटमुळे नवी कोरोना लाट आली होती. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉन तितका घातक नाही. मात्र, त्याचा फैलाव वेगाने होतो.

ओमिक्रॉनचे आतापर्यंत अनेक सबव्हेरियंट असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला BA.1 आणि BA. 2 व्हेरियंटचा प्रादूर्भाव दिसून आला होता. मात्र, आता BA.1.1, BA.3, BA.4 आणि BA. 5 या व्हेरियंटचे रुग्णही आढळून येत आहेत. BA.4 आणि BA. 5 या व्हेरियंटचा फैलाव BA.2 पेक्षा अधिक वेगाने होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका वाढला आहे, असे मानले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com