BadlapurNews:कल्याण-बदलापूर रोडवर दुचाकीचा भीषण अपघात; चार जण गंभीर जखमी

अपघातात महिला जोरात हवेत फेकली गेली.
Badlapur News
Badlapur Newsअजय दुधाणे, बदलापूर

Badlapur News: कल्याण बदलापूर रोडवर काल सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला आहे. एका दुचाकीने रस्त्याने चालत असलेल्या महिलेला जोरात धडक दिली. या अपघातात महिला जोरात हवेत फेकली गेली. तर दुचाकीवरील तीन मुलं देखील खाली कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण (kalyan) बदलापूर (badlapur) रोडवरील साईबाबा मंदिराजवळ एक महिला रस्ता ओलांडत असताना वेगात आलेल्या मोटरसायकलने या महिलेस उडवले. तसेच मोटरसायकलवर बसलेले तीन जण सुद्धा मोटरसायकलचा तोल जाऊन अत्यावश्य अवस्थेत खाली पडले. या अपघातात रेश्मा गुरुबानी,नीरज राजगुरू यांना जबर मार लागला असून त्यांना उल्हासनगरच्या मॅक्सि लाइफ या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Badlapur News
Kalyan-Dombivali : KDMC तील 18 गावं वगळून निवडणूक ? ; राज्य सरकारचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

दुचाकी चालक अनिकेत भडांगे यास कळवा येथील शिवाजी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आणि उमेश साळवे या जखमीवरती उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात इतका भीषण होता की अपघातातील सर्वच जण गंभीर जखमी आहेत. अपघातातील सर्व जखमी उल्हासनगर मधील आनंद नगर आणि फारवर लाईन येथील रहिवासी असल्याचे समजले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com