खिडकीचा गज काढून २ महिला कैदी पळाल्या; एकीस अटक, दूसरीचा शाेध सुरु

या दोघींवर पिटा कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात महिलांना न्यायालयाच्या आदेशाने एक वर्षाकरता पुनर्वसन करता ठेवण्यात आले होते.
खिडकीचा गज काढून २ महिला कैदी पळाल्या; एकीस अटक, दूसरीचा शाेध सुरु
ArrestSaam Tv

मुंबई : मानखुर्द देवनार येथे शासकीय नवजीवन महिला वसतिगृह या ठिकाणाहूून दोन महिला (women) कैदी शनिवारी रात्री फरार झाल्या हाेत्या. त्यापैकी एकीला अटक (arrest) करण्यात पाेलीसांना (police) यश आले असून दूसरीचा शाेध सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. (mankhurd latest marathi news)

या दाेन्ही महिला कैदी शनिवारी रात्री फरार झाल्या हाेत्या. काही तासातच गोवंडी पोलिसांनी एका महिला कैदीस ताब्यात घेतले. तिचे जरीना असे नाव असून ते मुळची पश्चिम बंगालची आहे आणि चेंबूर वाशी नाका या ठिकाणी वास्तव्यास असते अशी माहिती पाेलीसांनी दिली.

Arrest
Raj Thackeray: सुपारीचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही : संजय राऊत (व्हिडिओ पाहा)

दुसरी महिला कैदी आयशा उर्फ आरोही अन्सार अली सिद्दिकी ही एकोणीस वर्षाची असून ती अजून फरार आहे. पोलीस तिचा तपास करीत आहेत. या दाेन्ही महिला कैदी महिला सुधार केंद्रच्या शौचालयाच्या खिडकीचा गज काढून पसार झाल्या हाेत्या असे पाेलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या दोघींवर पिटा कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात महिलांना न्यायालयाच्या आदेशाने एक वर्षाकरता पुनर्वसन करता ठेवण्यात आले होते.

Edited By : Siddharth Latkar

Arrest
Amravati: हॅलाे..! ५०० लोक हत्यारांसह दंगल घडविणार; अफवेचा फोन करणारा अटकेत
Arrest
Akshaya Tritiya: दगडूशेठ हलवाई, गणपतीपुळे, पंचमुखी गणेशास आंब्यांची आरास (व्हिडिओ पाहा)
Arrest
Akshaya Tritiya: नांदेडात देवगडचा आंबा वधारला; अमरावतीत मटक्याची बाजारपेठ फुलली

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.