शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना डांबून ठेवलंय; निलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप

'शिवसेना पदाधिकाऱ्यांशी होत असलेल्या वर्तुणुकीबाबत पोलिस यंत्रणेकडून योग्य दखल घेण्याची मागणी'
Shivsena Uday Samant News
Shivsena Uday Samant NewsSaam TV

मुंबई : माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. या हल्ल्याप्रकरणी आयपीसीच्या विविध कलमान्वये तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत.

शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या पार्श्वभूमिवर शिवसेना उपनेत्या नीलम गोर्हे (Neelam Gorhe) यांनी आज पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची भेट घेऊन राज्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी होत असलेल्या वर्तुणुकीबाबत पोलिस यंत्रणेकडून योग्य दखल घेण्याची मागणी केली आहे.

पाहा व्हिडीओ -

या भेटीनंतर गोऱ्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्या म्हणाल्या, 'आम्ही पोलिस महासंचालकांना भेटून अनेक केसवर चर्चा केली. ज्या ठिकाणी अटक झाली नाही. तिथे ही जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यासारखे गुन्हे लावले आहेत.

उदय सामंत यांच्यावर अज्ञात इसमाने हल्ला केला. पण आमचे पदाधिकार तिथे नसताना त्यांना डांबून ठेवण्यात आलं आहे. सर्व संकेत पायदळी तुडवले जात आहेत. आमच्या वकीलांना माहीती देण्यात आली नाही.

जे लोक सुरत आणि गुवाहाटीला गेले, त्यांच्यासोबत जे सुरक्षा रक्षक गेले ते काय आमदारांच्या घरचे नोकर आहेत का? पुण्यातील पोलिसांवर दबाव आहे. सुडबुद्धीने राजकारण केले जात असून यामुळे रसत्यावरचे शिवसैनिक भरडले जात असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.

Shivsena Uday Samant News
Rahuri : अफगाणी धर्मगुरू खून प्रकरण; राहूरीतून तिघांना अटक

शिवसेनेच्या लोकांना वकील मिळू नये असा प्रयत्न -

दरम्यान, प्रसाद सावंतवर हल्ला झाला. त्यावर कारवाई होत नाही. उद्धव ठाकरे साहेबांनी संयम राखला शिवसैनिकांनी काहीच केले नाही. उलट शिवसैनिकांवर कारवाई होत आहे. गुन्हे टाकले जात आहे. कायदेयाचे उल्लंघन होत आहे ते योग्य नसल्याचं शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले.

तर शिवसैनिकांवर खोटे आरोप टाकले जात आहेत. शिंदे गटाच्या एका माणसाने आमच्या शिवसैनिकावर हल्ला केला तेंव्हा ३०७ लावला नाही. वस्तुस्थिती पहा आणि मग गुन्हे दाखल करा, आमच्या लोकांना वकील मिळू नये असा प्रयत्न केला गेला. ज्यांनी मेळावा घेतला त्यांच्यावरही गुन्हे दाखल केल्याचं खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com