
मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. शिवसेनेचे जवळपास ४० आमदार एकनाथ शिंदेंच्या गळाला लागले आहेत. तर १० अपक्ष आणि इतर छोट्या पक्षातील आमदार हे देखील एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये सामील झाले आहेत. याबाबत सर्वच राजकीय पक्षांकडून आणि नेत्याकडून विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. अशात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. (Udayanraje Bhosale Talks On Maharashtra Political Criris)
हे देखील पाहा -
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, याला भूकंप म्हणता येणार नाही, हे होणारच होतं. राज्यात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, याला भूकंप म्हणता येणार नाही, हे होणारच होतं. ज्यावेळी वेगवेगळ्या पक्षातील प्रमुखांनी घेतलेला हा निर्णय, निवडून आणलेल्या आमदारांचा विचार करुन हा निर्णय घेतला असता तर आघाडी झाली नसती असंही उदयनराजे म्हणाले. तसेच ही आघाडी सत्ता स्थापनेसाठी होती आणि फार काळ टिकणारं नव्हती. हे अनैसर्गिक होते असा टोलाही उदयराजे भोसले म्हणाले होते. तसेच जर ते महाविकास आघाडी म्हणून राहिले तर त्यांच्या आयुष्यातील ही शेवटची आमदारकी असेल असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.