Shivshakti-Bhimshakti: ठरलं! शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार; आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर अधिकृत घोषणा करण्याची शक्यता

Shivshakti-Bhimshakti Alliance: आज पत्रकार परिषद घेऊन या युतीची अधिकृत घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Prakash Ambedkar - Uddhav Thackeray
Prakash Ambedkar - Uddhav ThackeraySaam Tv

Mumbai : राज्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीची काही दिवसांपूर्वी युतीची घोषणा झाल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार आहे. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार असल्याची अधिकृत आज (23 जानेवारी) अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. आज पत्रकार परिषद घेऊन या युतीची अधिकृत घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (Latest Marathi News)

Prakash Ambedkar - Uddhav Thackeray
Sanjay Raut : राहुल गांधींच्या 'भारत जोडो'ला प्रतिसाद मिळत असल्याने PM मोदींनी...'; संजय राऊतांचा रोखठोक निशाणा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार असल्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची अधिकृत घोषणा आज उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर हे करणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर आज पत्रकार परिषद घेऊन या युतीची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या युतीबाबत मागील अनेक दिवसांपासून दोन प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. मध्यंतरी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची बैठकही झाली. आज दादरमध्ये आंबेडकर हाॅलमध्ये पत्रकार परिषद घेऊन युतीबाबत दोन्ही प्रमुख नेते आपली भूमिका मांडणार असल्याचे कळते.

प्रकाश आंबेडकरांनी मैत्रीचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना दिला होता. प्रकाश आंबेडकरांनी दोन ते तीन वेळा उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली होती. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व मान्य असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी आधीच म्हटलं. त्यामुळे राज्यातील दोन्ही दिग्गज नेते लवकरच एकत्र दिसण्याची शक्यता आहे.

Prakash Ambedkar - Uddhav Thackeray
Moreshwar Temurde : राष्ट्रवादीचे माजी आमदार अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महायुतीचं काय होणार ?

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीला काँग्रेस-राष्ट्रवादीचाही पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. वंचित बहुजन आघाडी महायुतीत सामील होणार, याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर उद्या पत्रकार परिषद घेणार असून साऱ्यांचे त्यांच्यावर लक्ष असणार आहे. उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महायुतीबाबत काय भाष्य केलं जाईल, हे पाहावे लागणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com