Uddhav Thackeray : मी घरी बसून जे केलं, ते सूरत-गुवाहाटीला जाऊन तुम्हाला जमलं नाही, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार-खासदारांना लगावला. मी घरी बसून सरकार चालवलं. घरी बसून मी जे काही करून दाखवलं, ते सूरत-गुवाहाटीला जाऊन त्यांना जमला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपने शिवसेनेचा वापर करुन घेतला. भाजपने हिंदुत्व कधी स्वीकारलं होत? ममता बॅनर्जींचा पाठिंबा घेतला तेव्हा कुठे गेलं होतं तुमचं हिंदुत्व? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. काँग्रेससोबत जाऊन आम्ही हिंदुत्व सोडलं असं तुम्ही म्हणता मग काश्मीरमध्ये मुफ्तींसोबत जाऊन तुम्ही काय केलं? अशी विचारणाही उद्धव ठाकरे यांनी केली. (Latest Marathi News)
उद्धव ठाकरे म्हणाले की, 'लोक येतात-जातात. मला अनेकदा विचारलं जातं की, तुम्हाला याबाबत आधी माहीत नव्हतं का? तुम्ही थांबवलं का नाही? पण त्यांना कशाला थांबवू, असं मी सांगितलं.'
ही सगळी माणसं विकली गेलेली आहेत. त्यांना सोबत घेऊन लढाई कशी लढू. दरवाजा उघडा आहे. ज्यांना थांबायचे आहे त्यांनी थांबावे. नाही तर गेट आऊट. मी त्यांना कशाला थांबवू. मला विकाऊ माणसे नकोत. ते शिवसैनिक होण्याच्या लायकीचे नाहीत. कुणी सांगेल तशीच भूमिका घ्यायची, इतका लाचार मी कधीच झालो नाही आणि होणारही नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना लगावला.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संबोधित करताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, तुमच्यात एकत्र लढण्याची हिंमत आणि इच्छा आहे का? हा महत्त्वाच प्रश्न आहे. यावर सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने हो म्हटलं. तुम्ही तिन्ही पक्षाचे एकत्र काम करत आहात. अशावेळी आगामी ग्रामपंचायत, आमदारकी, खासदारकीचं तिकीट नाही मिळालं तर? यावर सर्व कार्यकर्त्यांनी चालेल असं उत्तर दिलं. हे चाललंच पाहिजे. कारण नाही चाललं तर हुकूमशाही चालेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.