राज्यपालांनी २४ तासांत लोकशाहीचे पालन केले, पण...; ठाकरेंनी साधला कोश्यारींवर निशाणा

राज्यपालांनी २४ तासांत लोकशाहीचे पालन केले, पण १२ विधानपरिषद यादीवर आताही निर्णय घ्यावा, असे म्हणत त्यांनी ठाकरे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला.
Uddhav Thackeray and Bhagat Singh koshyari
Uddhav Thackeray and Bhagat Singh koshyari Saam Tv

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटाच्या बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार डळमळीत झालं असताना राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यावर शिवसेनेने या बहुमत चाचणी आदेशाच्या विरोधात याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणी ३० जून रोजी घेण्याचा निर्णय दिला. बहुमत चाचणी होण्याआधीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी राज्यपालांनी २४ तासांत लोकशाहीचे पालन केले, पण १२ विधानपरिषद यादीवर आता निर्णय घ्यावा, असे म्हणत त्यांनी ठाकरे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. ( Uddhav Thackeray News In marathi )

Uddhav Thackeray and Bhagat Singh koshyari
CM उद्धव ठाकरे यांचा राजीनामा! म्हणाले, बाळासाहेबांच्या पुत्राला खाली खेचण्याचं काम बंडखोरांनी केलं

फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,'सरकार म्हणून बळीराजाला कर्जमुक्त केले. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण उस्मानाबादचे धाराशिव करून आयुष्य सार्थकी लागले. शरद पवार आणि सोनिया गांधी या सहकाऱ्यांचे धन्यवाद. कॅबिनेटच्या मंत्रिमंडळात चारच शिवसेनेची मंत्री आज होते, कुणीही विरोध केला नाही. ज्यांनी करायचे होते ते नामानिराळे ज्यांनी विरोध भासवला त्यांनी समर्थन दिले'.

'अनेकांना शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठे केले, ज्यांना मोठे केले तेच विसरले. जे देणे शक्य होते ते सगळं दिलं. मातोश्रीला अनेक लोक येऊन पाठिंबा देतायत. ज्यांना दिलं ते नाराज, ज्यांना काहीच मिळाले नाही ते सोबत. हीच शिवसेना सामान्यांच्या पाठिंब्याने सुरु आहे,असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray and Bhagat Singh koshyari
Maharashtra Political Crisis Live: सत्ता आल्यावर ज्यांना सर्वकाही दिलं; ते लोक नाराज झाले : उद्धव ठाकरे

'न्याय देवतेने निकाल दिलाय. बहुमत चाचणीचा करण्याचा जो निर्णय. राज्यपालांनी २४ तासांत लोकशाहीचे पालन केले, पण १२ विधानपरिषद यादीवर आता निर्णय घ्यावा. काल पण आवाहन केले, तुमची नाराजी कोणावर आहे? ती सुरतला गुवाहटीला जाऊन सांगण्यापेक्षा मातोश्रीसमोर येऊन बोला. त्यांच्याशी वाद नकोय. इतकं नाते तोडले. कुणीही शिवसैनिकांनी यांच्यामध्ये येऊ नये. उद्या नवीन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. मी सांगतो तुमच्यामध्ये कुणी येणार नाही. किती आमदार आहे लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी होतो. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तर मला लाजिरवाणे वाटले असते. मला उद्याचा खेळच करायचा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खेचण्याचे पुण्य त्यांच्या पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही', असेही ठाकरे म्हणाले.

'सगळ्या समोर मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांचा आनंद त्यांना पेढे खाऊ द्या, मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. वारकरी म्हणतात उद्धव ठाकरेंच्या हस्ते हवीय. माऊली म्हणतील ते मान्य. महाराष्ट्रात दंगल झाली नाही मुस्लिम बांधवांनी पण ऐकले', असेही ते म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com