Uddhav Thackeray news: उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; म्हणाले, मिंदे गट फक्त...

'आज देखील ते दिल्लीला गेले आहेत, दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ असा प्रकार सुरु आहे.'
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSaam TV

Shivsena Melava Live: गोरेगावच्या नेस्को सभागृहामध्ये आज शिवसेनेच्या (Shivsena) वतीने गटप्रमुखांचा भव्य मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल केला. आजच्या भाषणामध्ये ठाकरे यांनी मुंबईला केंद्रस्थानी ठेवत भाषण केलं ते म्हणाले, देशाचं आर्थिक केंद्र त्यांच्या राज्यात पळवत आहेत.

राज्यातील नोकऱ्या चालल्या आहेत, वेदांता (Vedanta Foxconn) गेल्यानंतर खोटं बोलत आहेत. मात्र, यांना लाज वाटायला हवी, आपण कोणाची बाजू घेऊन कोणाशी भांडतोय, हा प्रकल्प कोणामुळे गेला हा वाद करत बसण्यापेक्षा आम्ही तुमच्यासोबत सोबत येतो. विरोधी आणि सत्ताधारी एकत्र राहून गेलेला प्रकल्प मागे आणुयात असं आवाहन देखील ठाकरे यांनी यावेळी केलं.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Shivsena Melava Live: यंदाचा दसरा मेळावा शीवतीर्थावरच; उद्धव ठाकरेंची घोषणा

ते पुढे म्हणाले, एक एक उद्योग राज्यातून बाहेर निघून जात आहेत आणि मिंदे गट फक्त शेळ्यांसारखा शेपट्या घालून बसला आहे. आणि होय महाराजा करत गप्प बसला आहे अशी जहरी टीका ठाकरेंनी शिंदे गटावर केली.

तसंच आज देखील ते दिल्लीला गेले आहेत, दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ असा प्रकार सुरु आहे. कितीवेळा दिल्लीसमोर झुकले असतील, हिंमत असेल तर पंतप्रधाना सांगा प्रकल्प मागे द्यायला. एवढंच काय आता ऐकायला मिळालं की, केंद्र सरकार आणखी सुविधा देणार आहे. याचा अर्थ यांच हे सर्व आधिच ठरलं होतं, असा आरोप देखील ठाकरेंनी यावेळी केंद्र सरकारवर केला.

पाहा व्हिडीओ -

मुंबईकरांनी आजपर्यंत शिवसेनेवर विश्वास ठेवला आहे. शिवसेना म्हणजे विश्वास आहे, शिवेसेना म्हणजे एक आधार आहे. शिवसेना म्हटल्यानंतर विकास आहे. मुंबईवर जेवढ्या आपत्ती आल्या त्यावेळी धावत जाणारी फक्त शिवसेना आणि शिवसैनिकच आहे असंही ठाकरे म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com