Shital Mhatre News : लाईव्हमध्ये तोच व्हिडीओ होता; मग डिलीट का केला? ठाकरे गटाच्या नेत्याचा सवाल

Shital Mhatre News : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात शाब्दिक युद्ध सुरू झालं.
Shital Mhatre News
Shital Mhatre Newssaam tv

Shital Mhatre News : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात शाब्दिक युद्ध सुरू झालं. व्हायरल व्हिडीओनंतर शीतल म्हात्रेंनी ठाकरे गटाला लक्ष्य करत टीका केली. तसेच त्यांचा व्हिडीऑ मॉर्फ केल्याचा आरोप करत पोलीस तक्रार केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत अनेकट ठिकाणी गुन्हे दाखल केले त्यानंतर काही जणांना अटकही केली. (Latest Marathi News)

Shital Mhatre News
Ahmednagar News : ​बोअरवेलमध्ये पडलेल्या 'त्या' चिमुकल्याचा अखेर मृत्यू; तब्बल ८ तासांनंतर मृतदेह काढला बाहेर

यात ठाकरे गटातील (Shivsena) साईनाथ दुर्गे नावाच्या कार्यकर्त्याचाही समावेश आहे. दरम्यान, या अटकेनंतर आता ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं असून काही सवालही उपस्थित केले आहे. 'शीतल म्हात्रे म्हणतात माझ्या व्हिडीओशी छेडछाड केली, मॉर्फिंग केलं. त्याबाबत पोलिसांकडे गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली. आमचा साईनाथ दुर्गे नावाचा कार्यकर्ता दोन दिवस बंगळुरूमध्ये बहिणीकडे गेला होता. त्याला विमानतळावरून अटक केली. हे काय सुरू आहे', असा सवाल घोसाळकर यांनी उपस्थित केला.

'शीतल म्हात्रेंचं म्हणणं इतकंच आहे की, त्या व्हिडीओशी छेडछाड झाली आहे. असं असेल तर पोलिसांनी तपासावं. राजू सुर्वेंच्या फेसबुकवरून त्या मिरवणुकीचं लाईव्ह प्रक्षेपण केलं होतं. लाईव्हमध्ये तोच व्हिडीओ होता. मग तो व्हिडीओ डिलीट का केला?', असा सवाल विनोद घोसाळकर यांनी विचारला. यावेळी त्यांनी दहिसर पोलीस स्टेशनला शीतल म्हात्रेंविरोधात तक्रार दिल्याचीही माहिती दिली.

Shital Mhatre News
Employees Strike : संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात शिंदे सरकार आक्रमक; दिला कारवाईचा इशारा

कोण आहेत शीतल म्हात्रे?

शीतल म्हात्रेंकडे मुंबई शिवसेनेतील आक्रमक चेहरा म्हणून पाहिलं जातं. राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी म्हात्रेंनी महिला पत्रकार म्हणून काम केलं आहे. त्यानंतर १३ वर्षांपूर्वी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. सुरुवातील शिवसेनेच्या पदाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांना नगरसेवकपदाची उमेदवारी मिळाली.

२०१२ साली शीतल म्हात्रे पहिल्यांदा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या. पुढे २०१७ सालीही म्हात्रे यांनी पुन्हा एकदा नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली. उत्तर मुंबईच्या दहिसर वॉर्ड नंबर ८ मधून त्यांनी दोन्हीवेळा नगरसेवकपदाची निवडणूक लढवली आणि जिंकली देखील.

दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारमधून बंड केल्यानंतर शितल म्हात्रे यांनी पत्रकारपरिषद घेत शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी शिंदे गटातच प्रवेश केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. हा प्रवेश आमदार प्रकाश सुर्वे यांच्या सल्ल्यानुसारच झाला असल्याची त्यावेळी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com