Uddhav Thackeray Group : शिवसैनिक आणि युवासेनेत खदखद? पदाधिकाऱ्यांच्या मनातील नेमकी सल काय?

युवासेना पदाधिकारी श्रेय घ्यायला पुढे असतात, पण गुन्हे घ्यायला पळतात, असं म्हणत सामान्य शिवसैनिकांनी खदखद व्यक्त केली आहे.
shivsena thackeray group
shivsena thackeray group saam tv

निवृत्ती बाबर

Maharashtra Political News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर केलेल्या आंदोलन प्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, आंदोलन प्रकरणी युवासेनेच्या एकाही एकाही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. युवासेना पदाधिकारी श्रेय घ्यायला पुढे असतात, पण गुन्हे घ्यायला पळतात, असं म्हणत सामान्य शिवसैनिकांनी खदखद व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

shivsena thackeray group
Mumbai : महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादाचे मुंबईत पडसाद; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला काळं फासलं

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या टीकेनंतर नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते.

नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर केलेल्या या आंदोलनाप्रकरणी काही शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, आंदोलनाचं नेतृत्व केलेल्या वरुण सरदेसाई आणि युवासेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल नाही. यावरून सामान्य शिवसैनिकांची खदखद समोर आली आहे.

shivsena thackeray group
Yashomati Thakur : 'भगवा परिधान करून...';रामदेव बाबांच्या 'त्या' वक्तव्यावर यशोमती ठाकूर भडकल्या

युवासेना श्रेय घ्यायला पुढे असते, पण गुन्हे घ्यायच्या वेळी पळते. युवासेनेतील पदाधिकाऱ्यांनी सत्तेत असताना आपली नावं मागे घेतली. मात्र आता सामान्य शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. नेतृत्व करायचं तर गुन्हे अंगावर घ्यायची ताकद ठेवा, अशा शब्दात सामान्य शिवसैनिकांनी खदखद व्यक्त केली आहे.

आमची खदखद कोणाकडे सांगणार, त्यांच्याकडे पॉवर आहे, आम्ही सामान्य कार्यकर्ते, आम्ही कोणाकडे तक्रार करायची, असेही सामान्य शिवसैनिक म्हणाले. युवासेनेच्या चमकेगिरीच्या या भूमिकेवर शिवसैनिकांची नाराजी पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com