uddhav Thackeray
uddhav Thackeray Saam TV

माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंचा कानमंत्र म्हणाले, 'शिंदे गटाकडे लक्ष देऊ नका आपली लढाई....'

मंत्रीमंडळाचा विस्तार होताच काहींचे चेहरे उतरले, शिंदे गटात गेलेले निवडूण येणार नाहीत.

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या (Shivsena) सर्व माजी नगरसेवकांसोबत एक बैठक घेतली. नगरसेवकांच्या या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपल्या नगरसेवकांना भावी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्यास सांगितलं आहे.

तसंच मुंबई महापालिकांच्या (BMC) बदललेल्या वॉर्ड रचनेबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. शिवाय ठाकरेंनी या सर्व माजी नगरसेवकांना कानमंत्रही दिला आहे.

या बैठकी दरम्यान ठाकरे म्हणाले -

१. शिंदे गटात गेलेले निवडून येणार नाहीत.

२. आमदार खासदार निवडणुकांमध्ये पडणार.

३. आपण आधीही भाजप विरोधात लढलो आणि जिंकलो.

४. या निवडणुकीत आपणच जिंकणारच.

५. विस्तार होताच काहींचे चेहरे उतरले आहेत, असं म्हणत शिंदे गटातील नाराजांना टोला.

६. स्थानिक पातळीवर संपर्क वाढवा, संघटना वाढीवर लक्ष द्या.

७. शिंदे गटाकडे लक्ष देऊ नका, आपली लढत भाजपसोबत आहे. असा कानमंत्र ठाकरेंनी आपल्या नगरसेवकांना दिला आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, येत्या काळात तुम्हाला खूप आमिष दाखवली जातील, आश्वासनं दिली जातील पण कुणाचं ऐकू नका. कामं करा, वॉर्डमध्ये फिरा, 2017 मध्ये जी वॉर्ड रचना होती तीच कायम ठेवली आहे. त्यामुळे आता आरक्षण पुन्हा येण्याची शक्यता आहे असंही उद्धव ठाकरे या बैठकीत म्हटल्याचं समजत आहे.

uddhav Thackeray
ShivSena Bhavan Dadar: शिंदे गटाकडून थेट मातोश्रीला आव्हान; दादरमध्ये उभारणार प्रति शिवसेना भवन

दरम्यान, या बैठकीनंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्या म्हणाल्या की, 'उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, मुंबईत मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. महानगरपालिका आपलं काम करत आहेच. मात्र, तुम्ही सुद्धा तुमची कामे करत रहा. लोकप्रतिनिधी म्हणून आणि निवडणुका होऊन दुसरा लोकप्रतिनिधी येत नाही तोपर्यंत लोकांची कामे करत रहा.शिवाय आम्ही केलेल्या कामावर आमचा विश्वास आहे जनता आमच्या पाठिशी आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com