उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
Raj Thackeray Viral Tweet
Raj Thackeray Viral TweetSaam Tv

मुंबई: बहुमत चाचणी अगोदरच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन करणार आहेत, असं बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत पहिली प्रतिक्रीया दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंड केले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते.

Raj Thackeray Viral Tweet
Maharashtra Political Crisis Live: राज्यातील मविआ सरकार कोसळल्यानंतर राज ठाकरेंचे ट्विट, म्हणाले...

'एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कतृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो!', अस ट्विट मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

हे ट्विट तिनही भाषेत करण्यात आले आहे. हिंदी, इंग्रजी आणि मराठी या तिनही भाषेत ही ट्विट करण्यात आले आहे.

Raj Thackeray Viral Tweet
औरंगाबादच्या नामांतरानंतर कॉंग्रेसमध्ये राजकीय भूकंप; आतापर्यंत २०० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उद्याच शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यासोबत ४ मंत्री शपथ घेणार आहेत.

एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट

आज सकाळी एकनाथ शिंदे गटातील कुणाला मंत्रीपद मिळणार या संदर्भात एक यादी व्हायरल झाली होती. मंत्रिमंडळाबाबत अजुनही आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही, अस एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) आज सांगितले आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी य संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. 'भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.' वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस',अस ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com