मोठी बातमी! शिवसेनेच्या मेळाव्यात लावली संजय राऊतांसाठी खुर्ची, चर्चांना उधाण; पाहा Video

राज्यातील सत्तासंघर्षानंतर आणि शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
Chair for Sanjay Raut
Chair for Sanjay RautSaam TV

रश्मी पुराणिक -

Uddhav Thackeray Sabha: राज्यातील सत्तासंघर्षानंतर आणि शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज पहिल्यांदाच जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून आज गोरेगावमधील नेस्को मैदानात सेनेच्या गटप्रमुखांचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

शिवाय राज्यात सध्या दसरा मेळाव्याच्या जागेवरुन रस्सीखेच सुरु असतानाच, आजची सभा ही दसरा मेळ्याव्याचा ट्रेलर असल्याचं बोललं जात आहे. मात्र, आजच्या मेळाव्यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे, शिवसेनेची तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सध्या पत्रा चाळ गैरव्यवहाराच्या घोटाळ्यामध्ये तुरुंगात असणाऱ्या संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नावाने देखील एक खु्र्ची ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात या घटनेची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, ज्या ठिकाणी सेनेतील सर्व मोठे नेते उपस्थित असणार आहेत. जेथून बोलणार आहेत. अनंत गीते आणि भास्कर जाधव यांच्यासाठी खुर्चा ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्यामध्ये संजय राऊतांसाठी एक खुर्ची ठेवण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊतांचे स्थान अजूनही मजबूत असल्याचं सेनेकडून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तर शिंदे गटाकडून या कृतीचा निषेध करण्यात आला आहे. संजय राऊत हे काही आरोपांखाली न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा असा उदोउदो करणं योग्य आहा का? असा सवाल देखील उपस्थित करण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com