उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट

शिवसेना आणि आपण स्वत: संजय राऊत यांच्या पाठिशी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam Tv

मुंबई - पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी काल शिवसेना नेते संजय राऊत (Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानी ईडीने (ED) धाड टाकली. पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीने संजय राऊत (Sanjay Raut) यांना यापूर्वी दोनदा समन्स बजावले होते; परंतु ते चौकशीसाठी अनुपस्थित राहिल्याने अखेर ईडीचे पथक रविवारी सकाळी राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. १५ तासांहून अधिक वेळ चौकशी केल्यानंतर ईडीने राऊतांना अटक केली. या कारवाईनंतर आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेत चौकशी केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी भांडुपमधील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी संजय राऊत यांच्या मातोश्री, पत्नी वर्षा, मुलगी आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी शिवसेना आणि आपण स्वत: संजय राऊत यांच्या पाठिशी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हे देखील पाहा -

उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. या भेटीत उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या मातोश्रींच्या तब्येतीची विचारपूस केली. तसंच शिवसेना आणि आपण स्वत: तुमच्या पाठिशी असल्याचं सांगितलं.

Uddhav Thackeray
Shiv Samvad Yatra | ...तर केसरकरांचे त्याचवेळी विसर्जन झाले असते; विनायक राऊतांची बोचरी टीका

दरम्यान, आज त्यांना घेऊन ईडीचे पथक जे.जे रुग्णालयाकडे रवाना झालं आहे. राऊत यांची जे.जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. कदाचित तपासणी झाल्यानंतर राऊत यांना थेट न्यायालयात नेलं जाणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांना जेल की बेल हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे, संजय राऊत अटकेनंतर मुंबईमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जवळपास २०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. १०० पोलीस ईडी कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आले आहे. तर 50 पोलीस हे जे जे रुग्णालयाबाहेर आणि ५० पोलीस कर्मचारी हे सत्र न्यायालयात तैनात करण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com