उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री... (पहा व्हिडिओ)

राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार स्वतःच्या ओझ्याने पडेल, अशी टीका भाजपकडून केली जात आहे.
उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री... (पहा व्हिडिओ)
उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री... (पहा व्हिडिओ) Saam Tv

मुंबई : राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार Government आहे. हे सरकार स्वतःच्या ओझ्याने पडेल, अशी टीका भाजपकडून BJP केली जात आहे. याबरोबरच कोरोनाची Corona स्थिती हाताळताना मुख्यमंत्री CM उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आणि महाविकास आघाडी सरकार कुठे तरी कमी पडत असल्याचे टीकाही विरोधकांकडून सतत केले जात आहे.

यावेळी महाविकास आघाडी सरकार आणि विशेष म्हणजे शिवसेनेसाठी ShivSena एक महत्वाची बातमी समोर आलीय. प्रश्नम या संस्थेने त्रैमासिक अहवाल जाहीर केला आहे. यात देशातील १३ राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर १ ठरले आहेत. द प्रिंटने याबद्दल बातमी देखील दिली आहे. प्रश्नम कडून देशामधील १३ राज्य निवडण्यात आले होते.

पहा व्हिडिओ-

यामध्ये बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश व उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. या १३ राज्यांमध्ये देशामधील एकूण लोकसंख्येच्या ६७ टक्के लोक राहतात. या सर्वेक्षणामध्ये विधानसभा निवडणुका पार पडलेल्या तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल व आसामचा समावेश यामध्ये नाही.

आंध्र प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड व हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये पॅनेल नसल्याने या राज्यांचाही सर्वेक्षणात समावेश करता आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. प्रश्नम ने घेतलेल्या सर्वेक्षणमध्ये १३ राज्यात मिळून एकूण १७ हजार ५०० जणांनी आपले मत नोंदवले आहे. महत्वाची बाब म्हणजे हे सर्वेक्षण सर्वात मोठ्या सर्वेक्षणापैकी एक असल्याच दावा केले जात आहे. दरम्यान, या सर्वेक्षणमध्ये ३ पर्याय देण्यात आले होते.

उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री... (पहा व्हिडिओ)
कोकण आणि माझे अतूट नाते ते कोणीही तोडू शकत नाही  - उद्धव ठाकरे ( पहा व्हिडिओ )

१. मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब असून, ते परत मु्ख्यमंत्री म्हणून नको.

२. मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असली, तरी परत त्यांना मत देणार नाही.

३. मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असून, परत हेच मुख्यमंत्री हवे.

या सर्वेक्षणमध्ये सर्वाधिक पसंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचे बघायला मिळत आहे. ४९ टक्के मतदारांनी उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीला आपले मत यावेळी नोंदवले आहे. याबरोबरच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना ४४ टक्के मते यावेळी मिळाली आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना ४० टक्के मते मिळाली आहेत.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com