
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: लोकसभा निवडणुकीत महाविकास् आघाडी एकत्र लढणार असं चित्र आहे. तरी जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. याआधीच्या निवडणुकीत अनेक जागांवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी सामना झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेला (Shiv Sena) जागा सोडाव्या लागणार हे स्पष्ट आहे.
मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला गेला आहे. इथे आतापर्यंत युत मध्ये शिवसेना जागा लढवत आली आहे. पण शिवसेना पक्ष फुटल्यावर ठाणे कल्याणमध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. २०१९ मध्ये ठाणे कल्याण जागा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना लढत झाली होती. पण येणाऱ्या निवडणुकीत या जागा राष्ट्रवादी ठाकरे गटासाठी सोडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
यातच शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाला चांगलाच टोला लगावलाय. राष्ट्रवादीला माहिती आहे ते ठाण्यातून निवडून येणार नाहीत म्हणून त्यांनी जागा ठाकरे गटाला दिली आहे. त्यांना सगळं खापर ठाकरे गटावर फोडायच आहे. आम्ही कोणत्याही आव्हानाला घाबरत नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. (Latest Marathi News)
एकनाथ शिंदे पक्ष सोडून गेल्यावर तिथलं लोकप्रतिनिधी गेले असेल तरी ठाण्यात राजन विचारे हे ठाकरे गट बरोबर आहेत. तर कल्याण जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे लढवत असेल तरी त्या जागी भाजप दावा करण्याची शक्यता आहे. या जागांवर पक्ष ताकद बघता राष्ट्रवादी या जागा ठाकरे गटाला सोडू शकते. त्यामुळे ठाणे आणि कल्याण मध्ये भाजप शिंदे गट विरुद्ध ठाकरे महवीकास आघाडी रणसंग्राम होण्याची शक्यता आहे
ठाणे मतदारसंघ
शिवसेना राजन विचारे
पडलेली मते ७ लाख ४० हजार ९६९
राष्ट्रवादी आनंद परांजपे
पडलेली मते ३ लाख २८ हजार ८२४ मते
कल्याण मतदारसंघ
शिवसेना
शिवसेना श्रीकांत शिंदे
पडलेली मते पाच लाख ५९ हजार ७२३
राष्ट्रवादी बाबाजी पाटील
पडलेली मते २ लाख १५ हजार ३८०
दरम्यान, ठाण्यात एकनाथ शिंदे विरुद्ध जितेंद्र आव्हाड वाद शिगेला पोहचला आहे. ठाण्यात आदित्य ठाकरे यांनी मोर्चा काढला तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी पण त्यात भाग घेतला होता. ठाणे आणि कल्याण मतदारसंघात ठाकरे गट पाठीशी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपली ताकद उभी करू शकतात.. त्यामुळे या मतदारसंघात भाजप अधिक शिंदे गट विरुद्ध ठाकरे महाविकास आघाडी असा रणसंग्राम होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात ठाकरे गट महाविकास आघाडी आपली किती ताकद लावते याकडे लक्ष आहे
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.