आता रश्मी ठाकरे मैदानात! बंडखोर आमदारांच्या पत्नींना करणार भावनिक आवाहन

उद्धव ठाकरे यांचा पत्नी रश्मी ठाकरे या देखील मैदानात उतरल्या आहेत.
Rashmi Thackeray Latest News
Rashmi Thackeray Latest News Saam TV

रश्मी पुराणिक

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन करून सुद्धा शिवसैनिकांनी आपलं बंड सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 40 हून अधिक आमदार सध्या गुवाहाटी येथे तळ ठोकून आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारचं बहुमत कमी झालं आहे. त्यामुळे शिवसेनेकडून हे बंड मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पत्नी रश्मी ठाकरे या देखील मैदानात उतरल्या आहेत. (Shivsena Latest News)

Rashmi Thackeray Latest News
Eknath Shinde : 'देवा लवकर आटप रे हे सगळं, हॉटेलचं बिल वाढतंय'

रश्मी ठाकरे यांचा आमदार कुटुंबियांशी अनेक दिवसांपासून संपर्क आहे. त्यामुळे त्या आता आमदारांच्या पत्नीना भावनिक आवाहन करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांचं बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. उद्धव ठाकरे हे सध्या आमदारांसोबत संपर्क साधत आहेत. दुसरीकडे आमदार कुटुंबीयांशी बोलण्याची जबाबदारी रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती आहे.

त्यामुळे आता रश्मी ठाकरे सुद्धा आमदार कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेना फुटू नये यासाठी रश्मी ठाकरे आमदारांच्या कुटुंबियांसोबत त्यांच्या पत्नी तसेच आईसोबत संपर्क साधतील आणि त्यांना भावनिक साद घालतील. दरम्यान, यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केलं होतं. तुम्ही मुंबईत या हवं तर मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.

Rashmi Thackeray Latest News
मतं मागायची असतील तर तुमच्या बापाच्या नावाने मागा; उद्धव ठाकरे बंडखोरांवर संतापले

मात्र एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आपलं बंड सुरूच ठेवलं आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी भावनिक साद घातल्यानंतर हे बंड मोडीत निघणार की अजून सुरूच राहणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com