...तर कसाबच्या मोबाइलमधून अनेक गोष्टी पुढे आल्या असत्या: निकम

कसाबच्या गहाळ झालेल्या मोबाइलवरून पून्हा एकदा नवा वाद समोर आला आहे.
...तर कसाबच्या मोबाइलमधून अनेक गोष्टी पुढे आल्या असत्या: निकम
...तर कसाबच्या मोबाइलमधून अनेक गोष्टी पुढे आल्या असत्या: निकमSaam Tv

सुरज सावंत

मुंबई : मुंबईवर (Mumbai) झालेल्या २६ / ११ या दहशतवादी हल्याला (Terrorist Attack) ८ वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. या हल्यात मुंबई पोलिसांचे अधिकारी व जवान शहिद झाले होते. यानंतर मुंबईच्या सुरक्षेवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या हल्यात दहशतवादी अजमल कसाबला (Ajmal Kasab) जिवंत पकडलं होतं, मात्र कसाबच्या गहाळ झालेल्या मोबाइलवरून पून्हा एकदा नवा वाद समोर आला आहे.

हे देखील पहा-

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) हे त्यावेळी दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत होते. परमबीर सिंह यांनी कसाबचा मोबाइल ताब्यात घेतला तो पून्हा तपास यंत्रणांना दिला नाही असा आरोप निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त समशेर पठाण Shamsher Pathan यांनी केला आहे. अशात कसाबचा जर मोबाइल सापडला असेल आणि तो जर मिळाला असता. तर अनेक गोष्टी समोर आल्या असत्या असे मत सरकारी वकिल उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी व्यक्त केल्याने या मोबाइलची चर्चा आता चांगलीच रंगू लागली आहे.

दहशतवादी कसाबच्या या मोबाइल प्रकरणाबाबत शमशेर पठाण यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं असून सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे या तक्रार अर्जात त्यांनी परमबीर सिंह यांनी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवला होता, अशी शंकाही व्यक्त केली आहे. परमबीर सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवून ठेवला होता किंवा कुणाला तरी दिला होता असं त्यांनी म्हटलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

...तर कसाबच्या मोबाइलमधून अनेक गोष्टी पुढे आल्या असत्या: निकम
सरकार पडेल ही भविष्यवाणी करून फडणवीस थकले, आता टेंडर राणेंकडे- मलिक

परमबीर सिंह यांनी महाराष्ट्र एटीएसमध्ये कार्यरत असताना अजमल कसाबचा मोबाईल चौकशीसाठी घेतला होता. या प्रकरणाची चौकशी मुंबई क्राइम ब्रांचकडे Mumbai Crime Branch देण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांनी तो मोबाईल क्राइम ब्रांचकडे दिला नव्हता, असा दावा पठाण यांनी तक्रारीत केला आहे. याबाबत सरकारी वकिल उज्वल निकम यांना प्रश्न केला असता. कसाबचा मोबाइल मिळाला असता. तर अनेक गोष्टी समोरआल्या असत्या अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्यास परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.