उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली; बदलापुरात उल्हास नदी दुथडी भरून

उल्हास नदी शेजारी असलेली चौपाटी पूर्ण पाण्याखाली
badlapur News
badlapur NewsSaam Tv

बदलापुर - बदलापुर (Badlapur) शहरातून वाहणारी  उल्हास नदी ने धोक्याची पातळी जवळ पोहचली असून,नदीचे पाणी पात्र सोडून बाहेर आले आहे. उल्हासनदी शेजारी बनविण्यात आलेली चौपाटी पूर्ण पाण्याखाली गेली आहे. नदीचे रौद्र रूप पाहून बदलापूर नगरपालिका अग्निशमन दलाचे अधिकारी नदी जवळ उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत असून,त्यामूळे नगरपालिका सतर्क झाली आहे.

बदलापुरात खड्ड्यांमुळे दोन मालवाहू रिक्षा उलटल्या

बदलापुरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे दोन मालवाहू रिक्षा उलटल्याच्या घटना घडल्या. धक्कादायक बाब म्हणजे एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी हे अपघात घडले. हे दोन्ही अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत.

बदलापूर शहरातून बारवी डॅममार्गे मुरबाडला जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड मोठमोठे खड्डे पडलेत. या रस्त्यावरील वालीवली गावाजवळ तर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. शनिवारी ९ जुलै रोजी दुपारी एक मालवाहू रिक्षा या रस्त्यावरून जात असताना खड्ड्यांमुळे ही रिक्षा उलटली. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा एकदा याच ठिकाणी आणखी एक मालवाहू रिक्षा उलटली.

या दोन्ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या. सुदैवाने या दोन्ही अपघातांमध्ये चालकांना फारशी इजा झाली नाही. मात्र या दिनही घटनांनी या रस्त्याच्या डागडुजीची जबाबदारी असलेल्या एमआयडीसीचं या रस्त्याकडे किती अक्षम्य दुर्लक्ष होतंय, हे पुन्हा एकदा समोर आलंय.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com