Ulhasnagar Crime: अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्यातील कुख्यात गुंड पोलिसांच्या जाळ्यात

आरोपीवर अल्पवयीन मुलीचं अपहरण प्रकरणात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल; आरोपीला गुजरात राज्यातून उल्हासनगर क्राईम ब्रांच ने ठोकल्या बेड्या
Ulhasnagar Crime: अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्यातील कुख्यात गुंड पोलिसांच्या जाळ्यात
Ulhasnagar Crimeअजय दुधाणे

उल्हासनगर - खुनाचा प्रयत्न आणि अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याची घटना उल्हासनगर पोलीस (Ulhasnagar Police) ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपीवर अपहरण तसेच पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या घटनेचा समांतर तपास उल्हासनगर (Ulhasnagar) पोलीस आणि क्राईम ब्रांच (Crime Branch) करत होती. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष सायअण्णा याने टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला केला होता आणि तो त्यादिवसांपासून फरार होता. त्यानंतर काही दिवसातच त्याने एका अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं होतं. (Ulhasnagar Latest Crime News in Marathi)

हे देखील पहा -

याप्रकरणी उल्हासनगर क्राईम ब्रांच ह्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत होती.आरोपीकडे मोबाईल (Mobile) फोन नसल्याने त्याचा तपास लागत नव्हता, त्यासाठी पोलिसांनी सुरूवातीला मिळालेल्या माहितीवरून उत्तर प्रदेशमध्ये आरोपीचा शोध घेतला परंतु हाती काही लागलं नाही. पुन्हा क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, गुजरात राज्यातील बडोदा या ठिकाणा वरून क्राईम ब्रांचच्या टीमने संतोषला बेड्या ठोकल्या आणि अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले.

Ulhasnagar Crime
Ulhasnagar: करबुडव्यांना पालिकेची 21 दिवसांची डेडलाईन; कर न भरल्यास संपत्ती जप्त

आरोपी संतोषवर आतापर्यंत दरोडा ,खुनाचा प्रयत्न आणि दंगल सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. क्राईम ब्रांचने आरोपीला उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीच्या माहितीच्या आधारावर आरोपीवर अपहरणासह पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com