उल्हासनगर: मनसेची 'बेस्ट खड्डा' स्पर्धा; खड्ड्यांचे फोटो पाठवण्याचं आवाहन

उल्हासनगरात सध्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांकडे महापालिका लक्ष देत नसल्यामुळे मनसेनं चक्क बेस्ट खड्डा स्पर्धा आयोजित केली आहे.
उल्हासनगर: मनसेची 'बेस्ट खड्डा' स्पर्धा; खड्ड्यांचे फोटो पाठवण्याचं आवाहन
उल्हासनगर: मनसेची 'बेस्ट खड्डा' स्पर्धा; खड्ड्यांचे फोटो पाठवण्याचं आवाहनअजय दुधाणे

अजय दुधाणे

उल्हासनगर: उल्हासनगरात Ulhasnagar सध्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांकडे महापालिका लक्ष देत नसल्यामुळे मनसेनं MNS चक्क बेस्ट खड्डा स्पर्धा आयोजित केली आहे.

हे देखील पहा-

उल्हासनगर शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो काढून पाठवण्याचं आवाहन मनसेने नागरिकांना केलं आहे. या खड्ड्यांच्या फोटोंचं प्रदर्शन मनसेकडून उल्हासनगर महापालिकेच्या बाहेर भरवलं जाणार आहे. तसेच यातील सर्वोत्कृष्ट चार छायाचित्रांना पारितोषिक देखील दिली जाणार आहेत.

या बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर, आयुक्त आणि स्थायी समिती सभापती यांनाही बोलवणार असल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली आहे. उल्हासनगर शहरात अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

उल्हासनगर: मनसेची 'बेस्ट खड्डा' स्पर्धा; खड्ड्यांचे फोटो पाठवण्याचं आवाहन
Mumbai Airport: आई-मुलीला 25 कोटींच्या हेरॉईनसह अटक!

एकीकडे नागरिक खड्ड्यांचा त्रास सहन करत असताना मंत्री एकनाथ शिंदे Eknath Sinde हे उल्हासनगरात येण्यापूर्वी चक्क खड्ड्यात साचलेल्या पाण्यात डांबर टाकून रस्त्यांची डागडुजी करण्यात आली होती. त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिका फक्त मंत्र्यांना दाखवण्यासाठी दिखाऊ काम करते का? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.

दरम्यान याबाबत उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना विचारलं असता पावसाळ्यापूर्वी शहरातील डांबरी रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदाराला आदेश दिले होते. मात्र सततच्या पावसामुळे जर पुन्हा खड्डे पडले असतील, तर संबंधित ठेकेदाराकडून ते बुजवून घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. मनसेच्या या आयडियाची सध्या उल्हासनगरात मोठी चर्चा सुरू आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com