हृदयद्रावक! खेळता खेळता बाळाने तोंडात टाकला मासा; श्वास अडकल्याने तडफडून मृत्यू

घशात मासा अडकून अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे.
Ambarnath News
Ambarnath News Saam Tv

उल्हासनगर : घशात मासा अडकून अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथच्या उलन चाळ परिसरात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होतेय. अंबरनाथ (Ambarnath) पश्चिमेच्या उलन चाळ परिसरात सरफराज अन्सारी हे त्यांच्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांना शहबाज नावाचा ६ महिन्यांचा मुलगा होता. (Ambarnath Today News In Marathi)

Ambarnath News
Wardha News : वर्ध्यात भरधाव कंटेनरची इलेक्ट्रीक दुचाकीला धडक; २ तरुणांचा जागीच मृत्यू

गुरुवारी रात्री शहबाज हा घराबाहेर इतर लहान मुलांसोबत खेळत असताना तो अचानक तडफडू लागला. त्यामुळे इतर मुलांनी शहबाजच्या पालकांना याची माहिती देताच शहबाजच्या पालकांनी त्याला घेऊन आधी एका खाजगी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, तिथे त्याला नेमकं काय झालं आहे? याचं निदानच होऊ शकलं नाही. (Latest Marathi News)

त्यामुळे बाळाला घेऊन त्यांनी उल्हासनगरचं शासकीय मध्यवर्ती रुग्णालय गाठलं. मात्र, तिथे पोहोचण्यापूर्वीच शहबाज याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी शहबाज याला तपासलं असता, त्याच्या घशात मासा अडकल्याचं आणि त्यामुळे त्याचा श्वास रोखला जाऊन त्याचा मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं. हा मासा डॉक्टरांनी त्याच्या घशातून बाहेर काढला.

यानंतर आता सकाळी या बाळाचं शवविच्छेदन करून त्याच्या मृत्यूचे नेमकं कारण शोधून काढलं जाणार असल्याची माहिती शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेमुळे अन्सारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आपल्या लहान मुलांकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज सुद्धा या निमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com