दराेड्याच्या तयारीतील सहा अटकेत; एनसीपी शहर सचिवाच्या पाेलीसांनी आवळल्या मुसक्या

यापुर्वी देखील राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील पदाधिका-यांवर गुन्हे दाखल आहेत.
दराेड्याच्या तयारीतील सहा अटकेत; एनसीपी शहर सचिवाच्या पाेलीसांनी आवळल्या मुसक्या
ulhasnagar police, ulhasnagar crime news, ncp leader sudhir singh, ulhasnagar latest marathi newsSaam Tv

उल्हासनगर : उल्हासनगर (ulhasnagar) कॅम्प क्रमांक एक येथील हनुमाननगर परिसरात मंगळवारी सायंकाळी दरोडा टाकण्याच्या तयारीतील एका टोळीला उल्हासनगर पोलिसांनी (ulhasnagar police) अटक (arrest) केली आहे. त्यांच्याकडून चार तलवारी, लोखंडी रॉड जप्त करण्यात आले आहे. संशियत आरोपींमध्ये सुधीर सिंग (sudhir singh) या राष्ट्रवादीच्या (ncp) शहर सचिवाचा समावेश असल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (ulhasnagar latest marathi news)

हनुमाननगर (hanumannagar) येथील पाण्याच्या टाकीजवळील एका घराजवळ काही जण दरोडा टाकण्यासाठी येत असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली. या चाैकशीत काही गंभीर गाेष्टी उघडकीस आल्या. त्यानंतर त्यांच्याकडून चार तलवारी, लोखंडी रॉडसह इतर वस्तू जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

ulhasnagar police, ulhasnagar crime news, ncp leader sudhir singh, ulhasnagar latest marathi news
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने रिक्षा चालकाकडून घेतले एक हजार रुपये; गुन्हा दाखल

या प्रकरणात फोजी बाबूसिंग लबाना, सूरज लोट, सुधीर सिंग, इनुस अन्सारी, नंदू उर्फ विजय कामेश्वर व सुमित जेठवानी यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत अशी माहिती प्रशांत मोहीते (पोलिस उपायुक्त) यांनी दिली.

ulhasnagar police, ulhasnagar crime news, ncp leader sudhir singh, ulhasnagar latest marathi news
FIFA U-17 Women's World Cup 2022 : फिफा महिला विश्वकरंडक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; नवी मुंबईत रंगणार अंतिम सामना

पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्यांमधील सुधीर सिंग हा राष्ट्रवादीचा शहर सचिव असल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षावर टीका होऊ लागली आहे. यापूर्वीही राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर विविध गुन्हे दाखल आहेत.

ulhasnagar police, ulhasnagar crime news, ncp leader sudhir singh, ulhasnagar latest marathi news
खेलो इंडियातील खेळाडूंसाठी 'साई' देणार पॉकेटमनी; २१८९ खेळाडूंसाठी ६.५२ कोटींची तरतूद

सुधीर हा राष्ट्रवादीचे नेते ओमी कलानी यांचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो. आता या प्रकरणामुळे शहरातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

Edited By : Siddharth Latkar

ulhasnagar police, ulhasnagar crime news, ncp leader sudhir singh, ulhasnagar latest marathi news
हद्दच झाली राव! खासदार, आमदारांनी बाेलाविलेल्या बैठकीत अधिकारी खेळत हाेते कॅंडी क्रश

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com