उल्हासनगरात संबळ अन् डीजेच्या तालावर पोलिसांचा ठेका

तणावपूर्ण आयुष्यात एक दिवस स्वच्छंदी जगण्‍याचा उपक्रम
Ulhasnagar Happy Street
Ulhasnagar Happy StreetSaam Tv

उल्हासनगर - एरव्ही कायम बंदोबस्तात, नाकाबंदीत किंवा गुन्ह्यांची उकल करण्यात व्यस्त असणारे पोलीस आज मात्र चक्क डीजे अन संबळच्या तालावर मुक्तपणे नाचताना पाहायला मिळाले. याचं कारण होतं, ते म्हणजे पोलिसांच्या (Police) वतीने आयोजित करण्यात आलेला 'हॅप्पी स्ट्रीट' उपक्रम.

हे देखील पाहा -

आपल्या रोजच्या तणावपूर्ण आयुष्यातून एक दिवस आपल्याला तणावमुक्त अन स्वच्छंदीपणे जगता यावं, यासाठी ठाणे पोलिसांच्या वतीने 'हॅप्पी स्ट्रीट' या उपक्रमाचं आयोजन केलं जातंय.उल्हासनगरच्या गोलमैदान परिसरात हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी नागरिकांना विविध प्रकारचे खेळ खेळण्यासह आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी देण्यात आली.

Ulhasnagar Happy Street
धक्कादायक! विम्याचे १ कोटी मिळविण्यासाठी सुपारी देऊन पतीची हत्या

विशेष म्हणजे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्यासह उल्हासनगर परिमंडळ ४ मधील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी हे यावेळी स्वच्छंदीपणे आणि मुक्तपणे गाण्याच्या तालावर नृत्य करताना पाहायला मिळाले. तर अनेक पोलिसांनी झिंगाट, संबळच्या तालावर ठेका धरला. असे उपक्रम आपल्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात महत्त्वाचे असल्याचं यावेळी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com