उल्हासनगर पोलिसांनी आवळल्या मोटार सायकल चोरांच्या मुसक्या

उल्हासनगर शहरात गजबलेल्या ठिकाणावरुन एकाच दिवसात चार मोटार सायकल चोरी झाल्याची घटना घडली होती. मात्र मोटारसायकल चोरांना पकडण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आलं आहे.
उल्हासनगर पोलिसांनी आवळल्या मोटार सायकल चोरांच्या मुसक्या
उल्हासनगर पोलिसांनी आवळल्या मोटार सायकल चोरांच्या मुसक्याSaam Tv

काही केल्या शहरातील चोरांचा सुळसुळाट कमी होत नाहीये. कधी एटीम ATM फोडणे तर कधी स्त्रियांच्या गळ्यातील दागिने लंपास करणे अशा अनेक घटना रोजच आपल्या कानावरती येत असतात. आणि गाड्यांची चोरी हे काही आपणाला नविन नाहीये. Ulhasnagar police have succeeded in catching motorcycle thieves.

अशातच उल्हासनगर शहरात गजबलेल्या ठिकाणावरुन एकाच दिवसात चार मोटार सायकल Motor cycle चोरी झाल्याची घटना घडली होती. मात्र मोटारसायकल चोरांना पकडण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आलं आहे. Police

उल्हासनगर पोलिसांनी मोटार सायकल चोरांना गजाआड केले असून ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

तसेच उल्हासनगर शहरात दुचाकीं वाहनांच्या चोरीचे सत्र थांबविण्यासाठी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त धूला टेळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार रेकॉर्डवरील गुन्हेगार सोनू पाल हा वापरत असलेला ऍक्टिवा मोटार सायकल ही चोरीची असल्याचे उल्हासनगर पोलिसांना समजताच त्यांनी सोनु विरोधात सापळा रचून पकडण्यात आले.

त्याने उल्हासनगर कॅम्प 3 येथील गणेश नगर येथे राहणारे सुरेश चौहान यांची मोटार सायकल नूर आलम अन्सारीच्या मदतीने चोरल्याचे तपासात समोर आल्यानंतर नूर आलम अन्सारीला अटक केली आहे. तसेच या दोघांनी चोरलेली काळ्या रंगाची पल्सर मोटार सायकल ही धोबीघाट येथील मिलन मटण शॉप येथून ताब्यात घेतली आहे.

अशा अतिशय सापळामय पध्दतीने या चोरट्यांनी पकडण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आलेलं आहे.

Edited By - Jagdish Patil

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com