Ulhasnagar: इस्टेट एजंट्सचा वृद्धेवर जीवघेणा हल्ला; एक एजंटला अटक

टोकन घेतलेले पैसे परत करत नसल्यानं झाला होता वाद...
Ulhasnagar: इस्टेट एजंट्सचा वृद्धेवर जीवघेणा हल्ला; एक एजंटला अटक
Ulhasnagar: इस्टेट एजंट्सचा वृद्धेवर जीवघेणा हल्ला; एक एजंटला अटकअजय दुधाणे

अजय दुधाणे

उल्हासनगर : दोन इस्टेट एजंट्सनी 2 Estate Agents Attacked Old Age Woman मिळून एका वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये Ulhasnagar घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे देखील पहा-

मधू गोलानी असं या हल्ल्यात जखमी झालेल्या (70) वर्षीय वृद्ध महिलेचं नाव आहे. मधू गोलानी यांचा उल्हासनगरच्या कॅम्प 4 परिसरातील अलंकार अपार्टमेंटमध्ये 6 व्या मजल्यावर फ्लॅट आहे. मधू यांना हा फ्लॅट विकायचा होता. त्यानुसार इस्टेट एजंट गणेश सोहंदा आणि रवी तलरेजा हे दोघे त्यांचा फ्लॅट विकून देण्यासाठी मदत करत होते.

त्यांनी मधू यांना 20 हजार टॅक्स आणि 21 हजार टोकन सुद्धा दिलं होतं. मात्र फ्लॅटच्या किमतीवरून हा व्यवहार रखडल्यानं हे एजंट मधू यांच्याकडे पैसे परत मागत होते. मात्र त्या टोकन म्हणून घेतलेले 21 हजार रुपये परत करत नसल्यानं मधू, तसंच दोन एजंट्स गणेश आणि रवी यांच्यात वाद झाले.

Ulhasnagar: इस्टेट एजंट्सचा वृद्धेवर जीवघेणा हल्ला; एक एजंटला अटक
महागाईचा आगडोंब! काडीपेटीही महागल्या...

याच वादातून गणेश आणि रवी या दोघा इस्टेट एजंट्सनी वृद्ध महिला मधू गोलानी यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला चढवला. यात मधू यांच्या डोक्याला, चेहऱ्याला, मानेला, हाताला अशा अनेक ठिकाणी वार झाले आहेत. त्यांच्यावर उल्हासनगरच्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार सुरू आहेत. या हल्ल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत गणेश सोहंदा याला बेड्या ठोकल्या आहेत. तर रवी तलरेजा हा फरार असून त्याचा शोध सध्या सुरू आहे. पोलिसांनी Ulhasnagar Police सध्या या प्रकरणावर काहीही बोलायला नकार दिला आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com