उल्हासनगर: दुचाकी चोराला अटक, पोलिसांनी २ मोटार सायकल केल्या जप्त...

दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने उल्हासनगर पोलिसांनी याबाबत गुप्त बातमीदाराना जागृत केलं होतं.
उल्हासनगर: दुचाकी चोराला अटक, पोलिसांनी २ मोटार सायकल केल्या जप्त...
उल्हासनगर: दुचाकी चोराला अटक, पोलिसांनी २ मोटार सायकल केल्या जप्त...अजय दुधाणे

उल्हासनगर: २१ नोव्हेंबर रोजी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या (Vitthalwadi Police Station) हद्दीतील ओटी चौकातुन राजशेखर खोल्लम यांची हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल चोरी झाली होती. दुचाकी चोरीच्या (Bike Theft) घटना वाढत असल्याने उल्हासनगर (Ulhasnahar Crime) पोलिसांनी याबाबत गुप्त बातमीदाराना जागृत केलं होतं. यावेळी एका गुप्त बातमीदाराने विठ्ठलवाडी पोलिस स्टेशनमधील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस शिपाई यांना माहिती दिली. (Ulhasnagar: Two-wheeler thief arrested, police seize 2 motorcycles)

हे देखील पहा -

विठ्ठलवाडी पोलिसांनी कुर्ला कॅम्प परिसरात सायंकाळी सापळा लावुन दिलावर चव्हाण या युवकास चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली असता त्याने अन्य एक मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने दिलावर यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून, या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com