"कुत्र्यांना का मारलं?" याचा जाब विचारला म्हणून दोघांना बेदम मारहाण!

उल्हासनगर मधील धक्कादायक घटना; संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !
"कुत्र्यांना का मारलं?" याचा जाब विचारला म्हणून दोघांना बेदम मारहाण!
"कुत्र्यांना का मारलं?" याचा जाब विचारला म्हणून दोघांना बेदम मारहाण!अजय दुधाणे

उल्हासनगर : भटक्या कुत्र्यांना का मारलं? म्हणून जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना बेदम मारहाण झाल्याची घटना उल्हासनगरच्या (Ulhasnagar) हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. प्राणीमित्र कैलास कल्याणी आणि राज चोटवानी हे भटक्या कुत्र्यांसाठी (dogs) दररोज रात्री बिस्कटे टाकण्यासाठी शहरात फिरत असतात.

हे देखील पहा :

२७ तारखेला रात्री १ वाजण्याच्या सुमारास कॅम्प पाच, स्वामी शांती प्रकाश शाळेजवळ भटक्या कुत्र्यांना बिस्कीट टाकून कैलास आणि राज हे गाडीजवळ उभे होते. त्याच दरम्यान रस्त्याच्या बाजूला पाच ते सहा जणांची टोळी दारू पीत बसली होती. त्यातील एका तरुणाने एका कुत्र्याला नारळ फेकून मारला.

"कुत्र्यांना का मारलं?" याचा जाब विचारला म्हणून दोघांना बेदम मारहाण!
लेकरू विनवणी करत राहिलं; मात्र, क्रूर बाप मारत राहिला! Video होतोय व्हायरल
"कुत्र्यांना का मारलं?" याचा जाब विचारला म्हणून दोघांना बेदम मारहाण!
Nagpur : डॉ.देवकाबाई बोबडे हत्याकांड; पैशांसाठी सख्ख्या नातूनेच केली आजीची हत्या!

त्याचा जाब विचारण्यासाठी राज आणि कैलास गेले असता या टोळीच्या काही जणांनी थेट कैलास आणि राज ला बेदम मारहाण केली. ही संपूर्ण सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झालीय. ह्या गुंडांनी कमरेचा पट्टा आणि लाथाबुक्क्याने मारहाण केलीय. याप्रकरणी हिललाईन पोलीस (Police) ठाण्यात या टोळी विरुद्ध कलम ३२४, प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना हिललाईन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com