उल्हास नदी वाचवण्यासाठी तरुणांची फिरती सलामी
उल्हास नदी वाचवण्यासाठी तरुणांची फिरती सलामीअजय दुधाणे

उल्हास नदी वाचवण्यासाठी तरुणांची फिरती सलामी

उल्हास नदीच्या मारेकऱ्यांचा तरुणांनी केला निषेध

उल्हासनगर - तरुणांनी चार थर उभारून मानवी मनोरे रचत प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या उल्हास नदीच्या Ulhas river संवर्धनासाठी फिरती सलामी दिली. पाचवा मैल इथं उल्हास नदीच्या किनाऱ्यावर हे मनोरे रचण्यात आले. उल्हास नदीत मागील काही वर्षात प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. औद्योगिक क्षेत्रातून उल्हास नदीत रासायनिक प्रदूषण chemical pollution होत आहे. या नदीमध्ये रासायनिक सांडपाण्याचे Chemical wastewater टँकर देखील सोडले जातात.

हे देखील पहा -

यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याने त्यांचा नदीकिनारी राहणाऱ्या आणि नदीवर उपजीविका अवलंबून असलेल्या स्थानिक आगरी कोळी बांधवांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळेच वरप, कांबा या भागातील काही तरुणांनी एकत्र येत उल्हास नदीच्या संवर्धनासाठी मानवी मनोरे रचले. यावेळी तरुणांनी चार थर उभारून मानवी मनोरे रचत प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या उल्हास नदीच्या संवर्धनासाठी फिरती सलामी दिली. भविष्यात उल्हास नदीत प्रदूषण करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशाराही यावेळी या तरुणांकडून देण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com