Bhiwandi Rape Case : भिवंडीत काकाने केला १६ वर्षीय पुतणीवर बलात्कार!

१६ वर्षीय अल्पवयीन अपंग मुलीवर तिच्याच काकाने बलात्कार केल्याची नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे.
Bhiwandi Rape Case : भिवंडीत काकाने केला १६ वर्षीय पुतणीवर बलात्कार!
Bhiwandi Rape Case : भिवंडीत काकाने केला १६ वर्षीय पुतणीवर बलात्कार!Saam Tv

भिवंडी : राज्यभरात विविध ठिकाणी झालेल्या महिला अत्याचाराच्या घटनांनी राज्याला हादरा बसला आहे. पुण्यात अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटना, मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणात दिल्लीच्या निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती आदी घटनांनी कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात आहे कि नाही असा प्रश्न निर्माण झाला असतानाच आता भिवंडी तालुक्यात देखील एक महिला अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हे देखील पहा :

१६ वर्षीय अल्पवयीन अपंग मुलीवर तिच्याच काकाने बलात्कार केल्याची नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी अपंग असून तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत या नराधम काकाने तिच्यावर अत्याचार केला आहे. प्राप्त माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील एका गावात हि पीडित अपंग आणि अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासमवेत राहते. तर त्याच गावामध्ये तिचा नराधम काका देखील राहतो. थोड्या दिवसांपूर्वीच आरोपीने या मुलीवर बलात्कार केला होता.

हेही वाचा :

Bhiwandi Rape Case : भिवंडीत काकाने केला १६ वर्षीय पुतणीवर बलात्कार!
Pune Crime : पॉर्नसाईटवर डॉक्टर युवतीचा मोबाईल नंबर टाकला; अन्...
Bhiwandi Rape Case : भिवंडीत काकाने केला १६ वर्षीय पुतणीवर बलात्कार!
Breaking |झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने वेटोळा घातलेला हा VIDEO पहाच
Bhiwandi Rape Case : भिवंडीत काकाने केला १६ वर्षीय पुतणीवर बलात्कार!
Breaking Nashik | नाशिकमध्ये महिलेची दुचाकी अडवत, कारमध्ये नेऊन बलात्कार!

त्यामुळे पीडित सतत मानसिक तणावाखाली होती. घरच्यांनी तिची सखोल विचारपूस केली असता तिने घडला प्रकार सांगितला आणि अत्याचाराची घटना उजेडात आली. पीडितेच्या कुटुंबीयांनी लगेचच भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पिडीतेचे जबाब नोंदवून व वैद्यकीय तपासणी करून नराधम काकाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com