
मुंबई : अंडरवर्ल्ड टेरर फंडिंग प्रकरणाचा तपास करणार्या एनआयएने अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रूट याला नुकतीच अटक केली होती. अंडरवर्ल्डबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एनआयएने सलीम फ्रूटच्या पत्नीचे जबाब नोंदवले, ज्यामध्ये त्याच्या पत्नीने मोठा खुलासा केला आहे.
पाकिस्तान विमानतळ आणि तेथे कार्यरत असलेले कर्मचारी अंडरवर्ल्ड डॉनच्या सांगण्यानुसार काम करतात. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे जगात कोण पाकिस्तानात येतंय आणि कोण पाकिस्तान सोडून जातंय याची नोंद जगात कुणाला मिळणार नाही. याच गोष्टीचा फायदा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम घेत असून आतापर्यंत त्याने अनेकांना पाकिस्तानच्या बैठकीसाठी बोलावले, मात्र त्याची माहिती कुणालाही मिळत नाही.
सलीम फ्रूटच्या पत्नीने NIA ला दिलेल्या जबाबात असे म्हटले की, ती अनेकवेळा पाकिस्तानला गेली आहे. जिथे छोटा शकीलचे लोक विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी येतात आणि त्यांच्या पासपोर्टवर शिक्का न मारता त्यांना विमानतळाबाहेर आणतात. 2013-14 मध्ये तीन वेळा पाकिस्तानला गेली होती. 2013 मध्ये ती आपल्या मुलांसह पाकिस्तानातील कराची येथे गेली होती. तिथे ती छोटा शकीलच्या मुलीच्या लग्नासाठी गेली होती, त्यावेळी सलीम फ्रूटसोबत गेला नव्हता.
तर दुसऱ्यांदा फ्रूटची पत्नी 24 मार्च 2014 रोजी पाकिस्तानला आपल्या मुलांसह कराची येथे गेली होती. त्यावेळी छोटा शकीलच्या दुसऱ्या मुलीच्या लग्नाचं, त्यावेळी देखील सलीम फ्रूट सोबत नव्हता. यूएईहून पाकिस्तान एअरलाइन्सने फ्रूटची पत्नी पाकिस्तात दाखल झाली. कराची विमानतळावर उतरल्यानंतर छोटा शकीलने पाठवलेले दोन व्यक्ती त्यांना घेण्यासाठी आले होते. या दोघांनी पाकिस्तानच्या विमानतळावरील कुठल्याही शासकीय यंत्रणाचा शिक्का पासपोर्टवर न घेता बाहेर काढले.
पाकिस्तानमधील ते 5-6 दिवस छोटा शकीलच्या घरी फ्रूटच्या घरी वास्तव्यास होती. लग्न सोहळा संपल्यानंतर त्याच लोकांनी फ्रूटच्या पत्नीला पुन्हा विमानतळावर कुठलाही शिक्का न लावता सोडले. फ्रूटच्या पत्नीला शकीलच्या माणसांनी फ्लाइटमध्ये बसवून यूएईची तिकिटे दिले. तिथून ती भारतात पुन्हा परतल्याचे जबाबात म्हटले आहेत.
फ्रूटच्या पत्नीने मुलांसह बेकायदेशीरपणे पाकिस्तानातील कराचीला गेल्याची कबूली दिली आहे. छोटा शकीलच्या पहिल्या मुलीच्या लग्नावेळी देखील विमानतळावर कुठल्याही प्रकारची नोंदणी न करता शकिलच्या माणसांनी पाकिस्तानात प्रवेश मिळवून दिला.निघतानाही तसंच झालं. एकूणच फ्रूटच्या पत्नीच्या जबाबातून डी कंपनीचे पाकिस्तानच्या विमानतळावर असलेलं नियंत्रण प्रामुख्याने दिसून येत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.