काँग्रेसने सहकाराचा वापर फायद्यासाठी केला; निर्मला सीतारामन यांची जोरदार टीका

निर्मला सीतारामन यांनी बारामतीत शरद पवार आणि काँग्रेसवर सहकार क्षेत्रावरून टीका केली.
nirmala sitharaman
nirmala sitharamansaam tv

प्राची कुलकर्णी

Nirmala sitharaman News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. या कार्यक्रमातून निर्मला सितारामन यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसवर निशाणा साधला जात आहे. आज, शुक्रवारी निर्मला सीतारामन यांनी बारामतीत शरद पवार आणि काँग्रेसवर (Congress) सहकार क्षेत्रावरून टीका केली.

nirmala sitharaman
Shivsena Latest News: शिवाजी पार्कात ठाकरेंचाच आवाज घुमणार; दसरा मेळाव्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज, शुक्रवारी बारामतीमधील भाजपच्या पक्ष कार्यालयाची भेट घेतली. त्यानंतर आयोजित मेळाव्यात निर्मला सीतारामन यांनी सहकार क्षेत्रावरून शरद पवार आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

निर्मला सीतारामन म्हणाल्या, 'सहकारात फक्त साखर आणि ऊस यांचीच चर्चा होते. कापड किंवा बाकी सहकार क्षेत्राबाबत काही चर्चा होत नाही. केंद्रीय मंत्री अमित शाह हे सहकाराशी संबंधित आहेत. केवळ मोदी सरकारनेच सहकाराचा विचार केला. मात्र, सहकार कायद्याचं उल्लंघन केलेल्यांनी त्यांचावर टीका केली'.

निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या, 'सहकार मंदिरासारखं आहे. त्यात राजकारण व्हायला नको. हे म्हणणारे सहकाराचा वापर स्वार्थासाठी ज्यांनी केला ते हे म्हणाले. मी बारामतीमध्ये बोलतोय म्हणजे हे कोण ते तुम्हाला कळलं असेलचं. सहकाराचं तत्व खूप चांगलं होतं. मात्र, त्याचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी केला गेला आणि गरिबांना पैसा मिळणं बंद झालं. काँग्रेसने सहकाराचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग केला. जहांगीर असल्यासारखं सारखं वापर केला आहे'.

nirmala sitharaman
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय...'; मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री भुसे यांची प्रतिक्रिया

'सहकार क्षेत्रात जे बदल झाले, काही चांगलं झालं ते नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर झाले. मोदींनी अमित शाह यांना सहकार मंत्री बनवलं त्यामुळे सहकार क्षेत्रात बदल झाले. नॅशनल कॉपरेटिव्ह डाटा बेससुद्धा तयार होतो आहे. केंद्र सरकारने निधी दिला आहे. त्याचा १३ हजार शेतकऱ्यांना फायदा होईल. न्यू एज्युकेशन आणि ट्रेनिंग योजना सहकारातील शिक्षणासाठी दिलं आहे. सहकार क्षेत्रातील खरेदी साठी परवानगी दिली आहे. सहकार संस्था सरकारप्रमाणे निर्णय घेऊ शकतात', असेही त्या म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com