पेट्रोल, डिझेलवर नितीन गडकरींचे मोठे विधान; भविष्यात करावा लागणार 'या' इंधनाचा वापर

भविष्यात ईलेक्ट्रिक ट्रक आणि ट्रॅक्टर लॉंच केले जाणार आहेत, असंही नितीन गडकरी म्हणाले.
Nitin Gadkari
Nitin GadkariSaam Tv

पुणे: आज पुण्यात वसंतदादा साखर इन्स्टिट्युट येथे साखर परिषद-२०२२ उद्घाटन झाले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी ऊस शेती, साखर कारखाने, इथेनॉल निर्मिती यावर भाष्य केले. 'आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृषि आणि ग्रामीण क्षेत्रात क्रांतीची गरज आहे. भविष्यात आपल्या देशात २५ लाख कोटी इंधन आयातीसाठी खर्च करावा लागणार आहे. रस्ते वाहतूकीत वाढ होऊन वाहनांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे इथेनॉल, मिथेनॉल, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रीक या पर्यायांना खूप वाव आहे, असं मत गडकरी यांनी व्यक्त केले.

भविष्यात वाहनांची संख्या वाढणार आहे. वाहतुकही वाढणार आहे. देशात २५ लाख कोटी इंधन आयातीसाठी खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे पेट्रोल (Petrol), डिझेलला सारख्या इंधनाला इथेनॉल, मिथेनॉल, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रीक या पर्यायांना खूप वाव आहे, असंही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari
मोठी बातमी! कॉंग्रेस नेत्याने अचानक राजकारणातून घेतला ब्रेक; कारण....

येणाऱ्या काळात ऊसाचे दर कमी होणार नाहीत, मात्र साखरेचे दर कमी होऊ शकतील. त्यामुळे येणाऱ्या काळात साखर उद्योग इथेनॉलकडे वळविणे ही काळाची गरज आहे. भविष्यात ईलेक्ट्रिक ट्रक आणि ट्रॅक्टर लॉंच केले जाणार आहेत. २५ ते २६ रुपये किलो साखरेचा दर होईल. पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले की साखरेचे दर कमी होतात. इथेनॉलचा वापर झाला पाहिजे. मी केंद्रीय मंत्र्यांशी बैठक घऊया. यासाठी मी मंत्र्यांशी बोलतो, असंही गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari
पाणीप्रश्नावरुन अजित पवारांच्या टीकेला प्रणिती शिंदेंचं उत्तर; भाजपवरही साधला निशाणा

पुण्यात इथेनॉलचे पंप सुरू करणार

नव्या तंत्रज्ञानामुळे इथेनॉलचे उपयोगिता मूल्य पेट्रोल एवढेच होणार असल्याने त्यांच्या किंमतीवरही फरक होईल. इथेनॉल हे हरित इंधन आहे, त्यामुळे प्रदूषण कमी होते. पुण्यात इंडियन ऑईलचे तीन पंप सुरू करण्याच्या सूचना कंपन्यांना करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्यासोबत पुण्यातील प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल. त्यामुळे शासनाने पुण्यात इथेनॉलचे पंप सुरू करण्यास पुढाकार घ्यावा. इथेनॉल निर्मिती शेतकऱ्यांना समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ड्रोनद्वारे फवारणी फायदेशीर आणि अधिक परिणामकारक असल्याने सुशिक्षित युवकांना सहाय्य करून त्यांच्या माध्यमातून ड्रोनद्वारे खत फवारणीबाबतही शासनाने प्रयत्न करावा. वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटने त्याबाबत मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे वीज देण्याबाबतही शासनाने विचार व्हावा, अशी सूचना गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com