राहुल गांधी यांनाच पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष करावे; रामदास आठवले असे का म्हणाले ?

कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणुकीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाष्य केलं आहे.
Ramdas Athawale And Rahul Gandhi
Ramdas Athawale And Rahul Gandhi saam tv

सचिन जाधव

Ramdas Athawale News : देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणुकीने वेधून घेतले आहे. येत्या १७ ऑक्टोबरला कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक (Congress) होणार आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे. तर कॉंग्रेसच्या अध्यक्षपद पुन्हा राहुल गांधी यांनाच मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणुकीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाष्य केलं आहे.

Ramdas Athawale And Rahul Gandhi
राजकारण तापलं ! 'तुमच्या बापानं शेकाेट्या पेटवल्या नाही, तुम्ही काय महाराष्ट्र पेटवणार'

रामदास आठवले सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आठवले हे पुण्यातील मानाच्या गणपतीसह इतर काही गणपतीचे दर्शन घेणार आहेत. रामदास आठवले यांनी आज, मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर भाष्य केलं. 'काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक सुरू आहे. आमची मागणी आहे की, काँग्रेसचे अध्यक्ष हे पुन्हा राहुल गांधी यांनाच करावे. त्यामुळे आम्हाला फायदा होतो. अडीच वर्षे झाली अजून चांगली जातील'

'विरोधी पक्षाला एकच सांगतो की,तुम्ही सगळे भेटत जावा. आम्ही मोठे होत जाऊ. मोदींचा सामना करणं अवघड आहे. मोदी मोठे नेते आहेत. त्यामुळे विरोधीपक्षांनी भेटत जावा. नितीश कुमार, ममता बॅनर्जी एकत्रित येत आहेत, हे चांगलं आहे. आम्ही तुमच्याशी लढू, तुम्ही आमच्याशी लढा',असेही आठवले म्हणाले.

Ramdas Athawale And Rahul Gandhi
Maharashtra Politics : राज ठाकरे घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

शिवसेनेच्या वादावर भाष्य करताना आठवले म्हणाले, 'खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यांना बाळासाहेब यांचं नाव घेण्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचं चिन्ह मिळेल असं वाटतं. एकनाथ शिंदे सध्या काम करताना दिसत आहे, पण आता उद्धव ठाकरे दिसत नाही'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com