कल्याणमध्ये नागरिकांचे साचलेल्या पाण्यात बसून अनोखं आंदोलन...

दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज नागरिक संतापलेल्या नागरिकांसह अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून ठिय्या आंदोलन केले.
कल्याणमध्ये नागरिकांचे साचलेल्या पाण्यात बसून अनोखं आंदोलन...
कल्याणमध्ये नागरिकांचे साचलेल्या पाण्यात बसून अनोखं आंदोलन...प्रदीप भणगे

प्रदीप भणगे
कल्याण : तीन दिवसापासून कल्याण डोंबिवली Kalyan Dombivali मध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आज पुन्हा सकाळ पासूनच पावसाने कल्याण डोंबिवली मध्ये एकच कसरत उडवून दिली. दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज नागरिक संतापलेल्या नागरिकांसह अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून ठिय्या आंदोलन Agitation केले.

हे देखील पहा-

आज दुपारी दोन तास कोसळलेल्या पावसाने कल्याण-मलंग रोड वरील आडवली Aadvali गावात देखील रस्त्यावर जवळपास गुडघाभर साचलं होतं. तर काही चाळी मध्ये देखील पाणी शिरलं होत.आडीवली गावात नालाच नाही, रस्त्याची दुरुस्ती होत नाही. त्यामुळे चक्क साचलेल्या पाण्यात बसून ठिय्या आंदोलन केले.

कल्याणमध्ये नागरिकांचे साचलेल्या पाण्यात बसून अनोखं आंदोलन...
कोविड काळात सेवा देणारे साडेपाचशे कंत्राटी कर्मचारी बेरोजगार !

यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत पालिकेचा निषेध नोंदवण्यात आला. 27 गावातील समस्यांबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील महापालिका दुर्लक्ष करते आहे, येत्या आठवडाभरात जर 27 गावांमधली रस्त्यासह नाल्याची काम सुरू केले नाही तर 27 गावाला जोडणारे सर्व रस्ते बंद करत रास्तारोको करू असा इशारा यावेळी माजी नगरसेवक कुणाल पाटील Kunal Patil यांनी दिला आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com