Navi Mumbai Cyber Crime News: मनपा आयुक्तांच्या नावे माजी नगरसेविकेकडे पैशांची मागणी; सतर्कतेमुळे डाव फसला

Navi Mumbai Cyber Crime News: मनपा आयुक्त आपल्याकडे 5 हजार रुपये कसे काय मागू शकतात? अशी शंका वैशाली नाईक यांच्या मनात आली.
Navi Mumbai Cyber Crime News
Navi Mumbai Cyber Crime Newsसिद्धेश म्हात्रे

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

Navi Mumbai Cyber Crime News: नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या नावाने माजी नगरसेविकेकडूनच पैसे उकळण्याचा (Fraud) प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोपरखैरणेमधील माजी नगरसेविका वैशाली नाईक यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे.

माजी नगरसेविका असलेल्या वैशाली नाईक यांच्या व्हॉट्सअॅपवर एका नंबरवरून मेसेजेस आले. त्यामध्ये आपण मनपा (Navi Mumbai Municiple Coropration) आयुक्त राजेश नार्वेकर असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गूगल पेद्वारे नगरसेविकेकडे 5 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. यासाठी एक लिंक देखील पाठवण्यात आली. (Online Fraud News)

Navi Mumbai Cyber Crime News
धक्कादायक! दीड महिन्यांच्या बाळाला पाजला मुदत संपलेला डोस; खाजगी रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल

मनपा आयुक्त आपल्याकडे 5 हजार रुपये कसे काय मागू शकतात? अशी शंका वैशाली नाईक यांच्या मनात आली. त्यावेळी त्यांनी आलेल्या फोन नंबरची खात्री केली. यावेळी त्यांना नंबरमध्ये तफावत आढळली. आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांच्य लक्षात आले आणि त्यामुळे फसवणूक करण्याचा प्रयत्न फसला.

दरम्यान, ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सायबर हल्लेखोरांनी सामान्य नागरिकांसह आता व्हीआयपी लोकांनाही लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अशा अज्ञात क्रमांकावरून फोन किंवा मेसेज आल्यास योग्य ती सावधगिरी पाळणे गरजेचे आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com