UP Elections 2022: लोकांना योगी सरकारबाबत अविश्वास वाटू लागलाय- सुप्रिया सुळे

UP Elections 2022: अखिलेश यादव आणि जयंत चौधरी ज्याप्रकारे लढत आहेत हे खूप समाधानकारक आहे. नक्कीच बदल होईल असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
UP Elections 2022: Supriya sule criticizes to yogi adityanath government
UP Elections 2022: Supriya sule criticizes to yogi adityanath governmentSaam News Digital

मुंबई: उत्तर प्रदेशचे मंत्री एसपी मौर्य यांनी समाजवादी पक्षात सामील होण्यासाठी राजीनामा दिल्यानंतर, आणखी एक विद्यमान राज्यमंत्री दारा सिंह चौहान यांनीही आगामी यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकांना योगी सरकारवर विश्वास नाही अशी टीका केली आहे. (UP Elections 2022 People start feeling distrust about Yogi government Supriya Sule)

हे देखील पहा -

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, उत्तर प्रदेशमध्ये आता अनेक मंत्री राजीनामा देत आहेत यावरून स्पष्ट होत आहे की, लोकांना तेथील सरकारबाबत अविश्वास वाटू लागला आहे. त्यामुळेचं तिथं अशी हालचाल दिसु लागली आहे अशी टीका त्यांनी केली आहे. पुढे त्या म्हणाल्या की, आमचं सरकार लोकशाहीला धरून आहे, त्यामुळे प्रत्येकाला मनमोकळेपणे बोलण्याचा आणि संवाद साधण्याचा इथं अधिकार आहे. नेताजी, अखिलेश यादव, जयंत चौधरी यांचे आभार मानते. अखिलेश यादव आणि जयंत चौधरी ज्याप्रकारे लढत आहेत हे खूप समाधानकारक आहे. नक्कीच बदल होईल. ज्याप्रकारे केंद्र सरकार निर्णय घेत आहे उदाहरणार्थ एलआयसी असो, जीएसटी कलेक्शन असो हे गंभीर आहे. विरोधकांना देखील यांनी विचारात घ्यायला हवं

ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ओबीसींच्या इम्पिरीकल डेटासाठी पंतप्रधान मोदी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा पत्र लिहिलं आहे. परंतु तरीदेखील त्यांच्याकडून कोर्टात एक आणि संसदेत एक अशी ओबीसी इम्पिरीकल डेटाबाबत माहिती दिली जाते, त्यामुळे कुठं तरी भाजपमधील ओबीसींमध्ये खदखद आहे असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

UP Elections 2022: Supriya sule criticizes to yogi adityanath government
UP Elections 2022: नवाब मलिक घेणार सपा नेते अखिलेश यादव यांची भेट...

तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, चंद्रकांत पाटील यांनी असं बोलणं हे योग्य नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. त्यामुळे काँग्रेस गोव्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत असेल तर त्यामध्ये गैर काय आहे. 12 निलंबित आमदारांबाबत महाविकास आघाडी नक्कीच योग्य निर्णय घेईल असंही त्या म्हणाला.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com