UPSC Exam Schedule: यूपीएससीचं संभाव्य वेळापत्रक जाहीर; अभ्यासाचं नियोजन करायला होईल मदत

UPSC Exam Schedule: वेळापत्रकानुसार अभ्यासाची तयारी करता यावी यासाठी आयोग दरवर्षी संभाव्य वेळापत्रक जारी करत असतो.
UPSC Recruitment 2023
UPSC Recruitment 2023Saam Tv

UPSC Schedule : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) पुढील वर्षाचे म्हणजेच 2024 चे संभाव्य वेळापत्रक जारी केलं आहे. यूपीएससीच्या उमेदवारांना वेळापत्रकानुसार अभ्यासाची तयारी करता यावी यासाठी आयोग दरवर्षी संभाव्य वेळापत्रक जारी करत असतो.

यूपीएससीने पुढील वर्षीच्या विविध २४ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यातील नागरी सेवा पूर्व परीक्षा २६ मे २०२४ रोजी नियोजित आहे. तर मुख्य परीक्षा सप्टेंबर २०२४ महिन्यात होणार आहे. (Latest News Update)

UPSC Recruitment 2023
Cabinet Decision: अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; मुख्यमंत्र्यांचे संबंधित विभागाला महत्त्वाचे आदेश

जाहिरात कधी निघणार?

यूपीएससीने परीक्षांच्या वेळापत्रकांसह जाहिरात आणि अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीची माहिती दिली आहे. वन सेवा, अभियांत्रिकी सेवा, एनडीए, वैद्यकीय सेवा, सीडीएस, जिओ सायन्टिस्ट, सीआयएसफ आदी परीक्षांचा समावेश आहे.

परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी हे वेळापत्रक यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. दरम्यान परिस्थितीनुसार परीक्षेच्या तारखा, अधिसूचना किंवा परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदतीच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

UPSC Recruitment 2023
Maternity leave: आनंदाची बातमी! प्रसूती रजेबाबत मोठा निर्णय; सलग ९ महिन्यांची रजा मिळणार?

महत्त्वाच्या परीक्षांचे २०२४ मधील वेळापत्रक

>> अभियांत्रिकी सेवा (पूर्व) परीक्षा- १८ फेब्रुवारी

>> सीडीएस परीक्षा (१) - २१ एप्रिल

>> नागरी सेवा (पूर्व) परीक्षा - २६ मे

>> भारतीय वन सेवा (पूर्व) - २६ मे

>> संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा - १४ जुलै

>> केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (ACS) परीक्षा - ४ ऑगस्ट

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com