तरुणीच्या हत्येच्या आरोपाखाली ७ वर्षे भोगला तुरुंगवास; जिला मृत समजलं तिने थाटलाय संसार

पोलीस डीएनए करून नवीन पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
UP news
UP newsSaam TV

अलीगड : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अलीगडमध्ये एक अजब घटना समोर आली आहे.गोंडा परिसरात तरुणीच्या हत्येची घटना समोर आली होती. याप्रकरणी आरोपी 7 वर्षांपासून शिक्षाही भोगत आहे. मात्र ही हत्या झालेली तरुणी जिवंत असल्याची माहिती आता समोर येत आहे.त्यामुळे पोलिसांसह सर्वांनीच आश्चर्यचकीत झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार गोंडा भागातील धंतोली गावात सात वर्षांपूर्वी मृत मुलगी आता अचानक समोर आली आहे. ही तरुणी तीच आहे की नाही यासाठी डीएनए मॅचिंगची परवानगीही पोलिसांना मिळाली आहे. आता पोलीस डीएनए करून नवीन पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Latest Marathi News)

UP news
विवाहबाह्य संबंध ठेवाल तर खबरदार! 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्यांवरही येईल पश्चातापाची वेळ

बेपत्ता मुलीला नातेवाईकांनी मृत सांगितल्यानंतर तरुणाला कारावास

17 फेब्रुवारी 2015 रोजी गोंडा परिसरातील धंतोली गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने गुन्हा दाखल केला होता. त्यात त्यांची दहावीत शिकणारी मुलगी बेपत्ता असल्याचे म्हटले होते. यामध्ये गावातीलच विष्णूवर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर काही महिन्यांनी आग्रा येथे एका किशोरवयीन मुलीचा मृतदेह सापडला होता. नातेवाइकांनी त्यांची मुलगी म्हणून मृतदेहाची ओळख पटवली होती. त्यामुळे विष्णूवर हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती.

UP news
Andhra Pradesh News : वर्षभरापासून बंद हाेते घर, दार उघडताच घरमालकाच्या पायाखालची जमीनच सरकली

तीन वर्षांपूर्वी विष्णू जामिनावर बाहेर आला होता, मात्र त्यानंतर त्याची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.आता तो तुरुंगातच आहे. आरोपी विष्णूची आई सुनीता गौतम यांनी माहिती दिली की ज्या मुलीच्या हत्येसाठी मुलगा तुरुंगात आहे, ती मुलगी हातरसमध्ये जिवंत असल्याचे पोलिसांना सांगितले जाते.

मुलीने हातरस येथील नागला चौकातील राजकुमार याच्याशी विवाह आहे. तपासादरम्यान मुलगी वेगळ्या नावाने राहत असल्याचे आढळून आले.पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com