मुंबई महानगरपालिकेतर्फे राबवली गेली विविध आजारांवरील लसीकरण मोहीम

मुंबई महानगरपालिकेकडून विविध आजारांवरील लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये न्यूमोकोकल काँज्युगेट व्हक्सीन म्हणजेच पिसिव्ही या विशेष लसीचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेतर्फे राबवली गेली विविध आजारांवरील लसीकरण मोहीम
मुंबई महानगरपालिकेतर्फे राबवली गेली विविध आजारांवरील लसीकरण मोहीमजयश्री मोरे

मुंबई - मुंबई महानगरपालिकेकडून Mumbai Municipal Corporation विविध आजारांवरील लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. Vaccination campaign on various diseases यामध्ये न्यूमोकोकल काँज्युगेट व्हक्सीन म्हणजेच पिसिव्ही Pneumococcal Conjugate Vaccine (PCV13) या विशेष लसीचा समावेश करण्यात आला आहे. या लसीमुळे 'न्यूमाकोकल न्यूमोनिया ' आणि इतर न्यूमोकोकल आजरांपासून ही लस लहान मुलांना संरक्षण देईल. Vaccination campaign on various diseases carried out by Mumbai Municipal Corporation

या आजाराने 5 वर्षांखालील अंदाजे 1 लाख बालमृत्यूची व 5 ते 6 लाख बालकांना न्यूमोनिया Pneumonia हा गंभीर आजार झाल्याची नोंद आहे. या आजारात फुफुसांना संसर्ग होऊन श्वास घेण्यास त्रास होतो व धाप लागते. संसर्ग गंभीर स्वरूपाचा असेल तर मेंदूज्वर, न्यूमोनिया सेप्टिसिमिया अशा कारणांमुळे मृत्यू ओढवतो. बालकांना सदर आजरापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पालिकेने इतर लसींबरोबर या लसीचा लसीकरण मोहिमेत समावेश केला आहे. खाजगी लसीकरण क्षेत्रात या लसीची किंमत 3 ते 4 हजार रुपये आहे. मात्र मुंबईकरांसाठी पालिकेने शासकीय तसेच पालिका रुग्णालयांत मोफत उपलब्ध केली आहे. बालकांना सहा आठवड्यात पहिली मात्रा,14 महिन्यात दुसरी तर नवव्या महिन्याला बूस्टर लस booster dose देण्यात येईल. ही लस बालकांना उजव्या मांडीवर स्नायूंमध्ये दिली जाते.

हे देखील पहा -

घाटकोपर ghatkopar येथील पंतनगर हेल्थ पोस्ट आणि गणेशनगर हेल्थ पोस्ट येथे राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव rakhi jadhav यांच्या माध्यमातून हे लसीकरण पालिकेने आयोजित केले आहे. या लसीकरणाला पालकांनी मोठा प्रतिसाद दिला.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com