लसी अभावी मुंबईत आज लसीकरण बंद

देशाभरासह राज्यामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होताना दिसून येत आहे.
लसी अभावी मुंबईत आज लसीकरण बंद
लसी अभावी मुंबईत आज लसीकरण बंदSaam Tv

मुंबई : देशाभरासह राज्यामध्ये state कोरोनाच्या Corona प्रादुर्भावात घट होताना दिसून येत आहे. यातच तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून सांगण्यात आली असून, यापार्श्वभूमीवर देशात लसीकरण मोहीमला वेग धरला आहे. परंतु, पुरेशा लसींच्या अभावी लसीकरण Vaccination मोहीमेत अडथळा येत आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणाऱ्या मुंबई मध्ये पुरेशा साठ्याअभावी लसीकरण मोहीम मध्ये अनेक अडथळे येत असल्याचे बघायला मिळत आहे. Vaccination closed in Mumbai today

आज मुंबईमधील Mumbai शासकीय व महापालिका Municipal Corporation केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. कोविड- १९ प्रतिबंध लसीकरण मोहिम मध्ये पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्याने, बृहन्मुंबई महानगरपालिका भागातील शासकीय व महानगरपालिका लसीकरण केंद्रांवरती आज लसीकरण बंद राहणार आहे, ही माहिती मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

हे देखील पहा-

लशींचा साठा जेवढ्या प्रमाणात प्राप्त होईल, त्यानुसार योग्य तो निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना लवकरच मिळवून देण्यात येईल, त्याचप्रमाणे लस साठा उपलब्ध झाल्यावर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. याची माहिती मुंबईकरांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. मुंबई मधील नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला याबद्दल सहकार्य करावे, असे आवाहनही मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. Vaccination closed in Mumbai today

देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने काही प्रमाणात घट झाल्याचे बघायला मिळत आहे. हे जरी खरे असले, तरी कोरोनापासून बचाव करण्यासाठी सध्या एकमेव मार्ग म्हणजे तो लसीकरण, असे तज्ज्ञांच्या वतीने वारंवार सांगितले जात आहे. १६ जानेवारीपासून देशभरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यातच मुंबईमध्ये १६ जूनपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती.

लसी अभावी मुंबईत आज लसीकरण बंद
कोरोना वाढतोय, आणि लस तुटवड्यामुळे लसीकरण सुद्धा बंद !

आतापर्यंत मुंबईकरांनी लसीकरणारा सकारात्मक प्रकारचा प्रतिसाद दिले आहे. या आठवड्यामध्ये केंद्र सरकारकडून लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने मुंबईमधील लसीकरण मोहीम काही प्रमाणात मंदावल्याचे बघायला मिळत आहे. मुंबई मध्ये कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्याचे बघायला मिळत आहे. यातच मुंबईमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ५४० कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

तर गेल्या २४ तासांमध्ये ६२८ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहे. सध्या मुंबईमधील ७७१४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहे. मुंबई शहराचा दर दुपटीचा कालावधी हा ८५८ दिवसांवर येऊन पोहोचला आहे. यातच मुंबईमध्ये आतापर्यंत ७०११९५ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहे. Vaccination closed in Mumbai today

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com