Measles Disease: उल्हासनगरात गोवर सदृश्य बालक आढळल्याने खळबळ, लसीकरण मोहीम सुरू

गोवर हा आजार लहान बालकांच्या जीवावर बेतू शकत असल्यामुळे पालकांमध्ये काळजीचं वातावरण आहे.
Ulhasnagar
UlhasnagarSaam TV

>> अजय दुधाणे

कल्याण : उल्हासनगर शहरात गोवर सदृश्य आजाराची लागण झालेलं बालक आढळून आलं आहे. या बालकावर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर शहरात गोवर प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.

राज्यात सध्या गोवरचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हा आजार लहान बालकांच्या जीवावर बेतू शकत असल्यामुळे पालकांमध्ये काळजीचं वातावरण आहे. अशातच उल्हासनगर शहरात एका नऊ महिन्यांच्या बालकात गोवर सदृश्य आजाराची लक्षणं आढळून आली होती.

Ulhasnagar
Measles Disease : लहान मुलांमध्ये गोवर पसरतोय? अशी घ्या काळजी

या बालकावर उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात आठ दिवस उपचार करण्यात आले आणि त्याला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र त्याचा गोवरचा रिपोर्ट अजूनही पॉझिटिव्ह आलेला नसल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली.

सोबतच शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात येणाऱ्या बालकांसाठी गोवर प्रतिबंधक लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. तसेच आत्तापर्यंत २८४ बालकांना गोवर प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Ulhasnagar
Sleeping Tips : शांत झोप लागत नाहीये ? 'हा' व्यायाम करा, लगेच जाणवेल फरक

तर सध्या रुग्णालयात ४३५ लसींचा साठा असल्याचं डॉ. मनोहर बनसोडे यांनी सांगितलं. गोवरचा सध्याचा वाढता प्रादुर्भाव पाहता या आजारासाठी १० बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com