भांडुपमधील सोनापूर परिसरात सेक्स वर्कर्स चे लसीकरण

महापालिकेने याच परिसरातील एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयामध्ये लसीकरण केंद्र उभारलं आणि तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या महिलांचे लसीकरण करण्यात आले.
भांडुपमधील सोनापूर परिसरात सेक्स वर्कर्स चे लसीकरण
भांडुपमधील सोनापूर परिसरात सेक्स वर्कर्स चे लसीकरणSaamTv

मुंबई : मुंबईतल्या अनेक रेड लाईट एरिया मध्ये काम करणाऱ्या महिलांकडे स्वतःची कागदपत्रे नसतात. कागदपत्रांअभावी या महिलांना विविध त्रासाला सामोरे जावे लागते. अश्यातच कोरोना महामारीसारख्या परिस्थितीत तर या देह विक्रय करणाऱ्या महिलांच्या लसीकरणात फार मोठ्या अडचणी येत आहेत व पर्यायाने त्यांचं लसीकरण केलं जात नाही. Vaccination of sex workers in Sonapur area of Bhandup

हे देखील पहा -

मात्र, मुंबई महानगरपालिकेकडून आता यासाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत भांडुपमधील सोनापूर परिसरात असलेल्या सेक्स वर्कर्स चे लसीकरण आज पार पडलं.

यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून काही सामाजिक संस्थांना एकत्र घेऊन या परिसरामध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली आणि कोरोनाला अटकाव घालायचा असेल तर लसीकरण किती महत्त्वाचे आहे याबाबत या महिलांमध्ये जागृती करण्यात आली.

भांडुपमधील सोनापूर परिसरात सेक्स वर्कर्स चे लसीकरण
बड्या डाॅक्टरनेच लावले महिला सहकाऱ्याच्या रुममध्ये स्पाय कॅम ! (पहा व्हिडीओ)

यासाठी महापालिकेने याच परिसरातील एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयामध्ये लसीकरण केंद्र उभारलं आणि तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या महिलांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात येथील अडीचशे महिलांना लस देण्यात आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com