
Prakash ambedkar News : 'देशात वैदिक परंपरा आणि संताची परंपरा आहे. आपण कोणती मानणार? प्रबोधनकार ठाकरे यांनी जातिव्यवस्थेच्या विरोधात आसूड मारले आहे. देशाच्या भवित्यवाचा विचार केला, त्यात त्यांनी धर्म सार्वजनिक करण्याच प्रयत्न केला, असे विचार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ' देशात वैदिक परंपरा आणि संताची परंपरा आहे. आपण कोणती मानणार? असा सवाल देखील आंबेडकरांनी उपस्थितांना केला. (Latest Marthi News)
प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आणि विचार वाचकांपर्यत पोहचविणाऱ्या 'प्रबोधनकार डॉट कॉम' या वेबसाईटच्या लोकार्पणाच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आज, रविवारी एकाच मंचावर दिसले.
प्रकाश आंबेडकर उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, ' प्रबोधनकार ठाकरे जे आता वाचेल. त्याला आजच्या काळात धक्का बसेल. राजकीय आणि सामाजिक धक्का सुद्धा असेल'.
'गुलामी केवळ एकाच समाजाची आहे. राजेशाही कल्पना क्षत्रियांची होती. क्षत्रिय हरला तर सगळे हरले. याला अपवाद केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दिसतो. आपण मनुच्या कायद्यात अडकून पडणार आहोत, की नव्याने निर्माण करणार आहोत, असे आंबेडकर म्हणाले.
' देशात वैदिक परंपरा आणि संताची परंपरा आहे. आपण कोणती मानणार? प्रबोधनकार ठाकरे यांनी जातिव्यवस्थेच्या विरोधात आसूड मारले आहे. देशाच्या भवित्यवाचा विचार केला, त्यात त्यांनी धर्म सार्वजनिक करण्याच प्रयत्न केला. महात्मा गांधी, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म नाकारला नाही. या सर्वांनी धर्मात सुधारणा झाल्या पाहिजे असे विचार मांडले, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
'प्रबोधनकार ठाकरे यांनी समता, बंधुता कशी येईल असं लिखाण त्यांनी केलं. माणसं भाषा आणि संस्कृतीमुळे एकत्र येतात. दडपशाही बघायाची असेल तर वैदिक धर्मात देखील लोकशाही नाही, तिथे हुकूमशाही आहे. वारी देखील एक प्रकारचं बंड आहे. दोन व्यवस्था एकाच वेळी घेऊन चालू शकत नाही. वैदिक धर्म म्हणजे विधवेचं मुंडण करणं आणि संत परंपरेमध्ये विधवेचं पुनविर्वाह करणे आहे, असेही मत आंबेडकरांनी मांडले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.