दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क, गावठी कट्टे बाळगणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एक खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे.
Pune Police
Pune PoliceSaam Tv

संजय गडदे

मुंबई : बुधवारी होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरु असतानाच एक खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. विविध ठिकाणी मुंबई पोलिसांकडून सर्च ऑपरेशनदेखील सुरु करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

अशातच आता मुंबईतील अंधेरी भागात चार बंगला परिसरातून दोन गावठी कट्टे आणि सहा जीवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहे. गावठी कट्टे बाळगणाऱ्या आरोपींना वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. शनिसिंग मुकेशसिंग ठाकूर आणि अब्दुल करीम रहमान अन्वर कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. (Mumbai crime latest news update)

Pune Police
'प्रादेशिक पप्पू होण्यासाठी तुम्ही धडपड करत आहात'; भाजपने 'त्या' विधानावरून साधला नाना पटोलेंवर निशाणा

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत विजयादशमीच्या दिवशी होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस (Mumbai Police) अलर्ट मोडवर आले आहेत. दसरा मेळाव्याला काही तास उरले असताना मुंबई पोलिसांकडून विविध ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात येत आहेत. अशातच आता अंधेरी पश्चिमेकडील चार बंगला म्हाडा परिसरातून दोन गावठी कट्टे आणि सहा जिवंत काडतुसासह दोघांना अटक करण्यात आली आहे.

Pune Police
LIVE मॅचमध्ये भारताच्या दिग्गज फलंदाजाला दिला धक्का; दोघेही भिडले, VIDEO व्हायरल

शनिसिंग मुकेशसिंग ठाकूर आणि अब्दुल करीम रहमान अन्वर कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या आरोपींच्या निशाण्यावर कोणी राजकीय नेते होते का? त्यांनी ही शस्त्रे मुंबईत कशासाठी मागवली? या संदर्भात वर्सोवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com