Vasai : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; तरुणी ५ महिन्यांची गरोदर!

लग्न करण्याच्या नावाखाली सतत शरीरसंबंध ठेवल्याने तरुणी गरोदर राहिली. पाच महिन्यांची गरोदर राहिल्याचे लक्षात येताच तरुणीचे कुटुंबीय हादरले.
Vasai : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; तरुणी ५ महिन्यांची गरोदर!
Vasai : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; तरुणी ५ महिन्यांची गरोदर!चेतन इंगळे

चेतन इंगळे

वसई/विरार : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सदर कारवाई वसई रोड लोहमार्ग पोलिसांनी तेलंगणा राज्यात केली. आरोपीने वारंवार शरीरसंबंध ठेवल्याने तरुणी पाच महिन्यांची गरोदर राहिली होती. तरुणीच्या तक्रारीवरुन वसई लोहमार्ग पोलिस आरोपीचा शोध घेत होते. अखेर या आरोपीला तेलंगणा येथून रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

हे देखील पहा :

वसई रोड रेल्वे स्थानकाबाहेर फळे विकून २१ वर्षीय तरुणी कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होती. फळे विकताना डिसेंबर २०२० महिन्यात तरुणीची ओळख शेष प्रसाद ऊर्फ दीपू हिरालाल पांडे याच्याशी झाली. पांडे हा रेल्वे स्थानकात हमालीचे काम करून वसई रोड स्थानकातच राहायचा. रोजच्या गाठीभेटीतून पांडे याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्तापित केले. लग्न करण्याच्या नावाखाली सतत शरीरसंबंध ठेवल्याने तरुणी गरोदर राहिली. पाच महिन्यांची गरोदर राहिल्याचे लक्षात येताच तरुणीचे कुटुंबीय हादरले.

Vasai : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; तरुणी ५ महिन्यांची गरोदर!
ATM क्लोन करणारी टोळी यवतमाळ पोलिसांच्या जाळ्यात; Bihar मधून दोघांना अटक!

पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी तात्काळ वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रसंग लोहमार्ग पोलिसांना सांगितला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याचे समजताच पांडे याने पळ काढला व मोबाईल क्रमांकही बंद केला. तपासादरम्यान लोहमार्ग पोलिसांचे पथक पांडे याच्या मूळगावी मध्य प्रदेश येथे दाखल झाले. तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता पांडे हा तेलंगणा राज्यात असल्याचे लोहमार्ग पोलिसांना समजले. लोहमार्ग पोलिसांचे पथक हैदराबादला रवाना झाले. वेशांतर करून लोेहमार्ग पोलिसांनी सलग तीन-चार दिवस सापळा लावून पांडेच्या मुसक्या आवळल्या.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.